Mumbai Railways: मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार आणखी वेगवान; 33,690 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

Mumbai Rail projects: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रकल्पांसाठी 33690 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
  • बोरीवली आणि विरार दरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गिकेसाठी 33.6 हजार कोटी रुपये मंजूर
  • गोरेगाव - बोरीवली हार्बर लाईनचा विस्तार, कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेसह प्रकल्पांसह 18 स्थानकांचा विकास होणार

Mumbai Local Train projects : मुंबईतील लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे कारण त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयूटीपी) Mumbai Urban Transport Project हे मुंबई महागनर (एमएमआर) MMR क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

CSMT-कुर्ला पाचवी, सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावी मार्गिका

एमआरव्हीसीच्यावतीने एमयूटीपी-1, एमयूटीपी-2 या प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. एमयुटीपी –1 मध्ये नऊ वरून 12 डब्ब्यांच्या उपनगरीय गाड्या सुरु करण्यात यश आले. बोरीवली- विरार आणि कुर्ला – ठाणे या जादा मार्गिका सुरु करण्यात यश आले. एमयूटीपी –2 मध्ये सर्व डीसी गाड्यांचे एसीमध्ये परिवर्तन करण्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला. याशिवाय ठाणे आणि दिवा दरम्यान पाचवी, सहावी मार्गिकाही सुरु करता आल्याची माहिती देण्यात आली. एमयूटीपी – 2 मध्येच सीएसएमटी-कुर्ला पाचवी, सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावी मार्गिका हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत.

हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय

गोरेगांव-बोरीवली हार्बर लाईनचा विस्तार

एमयूटीपी-3 मध्ये पनवेल – कर्जत हा प्रकल्प 39 टक्के, ऐरोली-कळवा हा प्रकल्प 43 टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय मार्गिका सुरक्षा उपाय आणि अन्य सुविधाही 57 टक्के पूर्ण झाल्या आहेत. एमयूटीपी – 3 ए मध्ये बोरीवली- विरार पाचवी आणि सहावी मार्गिका तसेच गोरेगांव-बोरीवली हार्बर लाईनचा विस्तार, कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका, कल्याण-असनगांव चौथी मार्गिका या प्रकल्पांसह सुमारे 18 स्थानकांचा विकास असे प्रकल्प नियोजित असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांसाठी आवश्यक वित्तीय सहभागाबाबतही चर्चा झाली.

हे पण वाचा : रिफाईंड तेलामुळे होतात हे आजार, तुम्ही सुद्धा वापरता?

अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा

रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण, झोपडपट्ट्या हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा. झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए)प्रमाणेच एक नियोजन प्रणाली राबवण्यात यावी. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रेल्वेला जमीन उपलब्ध होईल. तसेच अशा रहिवाशांचे सुयोग्य पुनर्वसनही शक्य होईल. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी