लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून 'या' लोकलच्या तिकीट दरात वाढ

मुंबई
Updated May 31, 2019 | 08:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

रेल्वे मंत्रालाने मुंबईकरांना एक झटका दिला आहे. कारण, पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल ट्रेनच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. म्हणजेच आता एसी लोकल ट्रेनचा प्रवास महागणार आहे.

mumbai local train ac local fare hike
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: तुम्ही मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करता? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. कारण, एसी लोकल ट्रेनसाठी प्रवाशांना देण्यात येणारी सूट आता बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्यापासून म्हणजेच १ जून २०१९ पासून एसी लोकल ट्रेनचा प्रवास महागणार आहे. यामुळे आता एसी लोकल ट्रेनच्या प्रथम दर्जाच्या प्रवासाचं तिकीट हे सध्याच्या तिकीट दरापेक्षा १.३ पट अधिक असणार आहे.

२५ डिसेंबर २०१७ रोजी एसी लोकल ट्रेनची मुंबईत सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत एसी लोकल ट्रेनच्या तिकीट दरात सूट देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला होता. या अंतर्गत एसी ईएमयू ट्रेनच्या प्रथम दर्जाचं तिकीट दर १.२ पटीने आकारण्यात आलं होतं. मात्र, नंतर रेल्वे मंडळाने ३१ मे २०१९ पर्यंत ही सूट देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता रेल्वे मंडळाने तिकीट दरात वाढ करण्याचं जाहीर केलं आहे. 

नवे तिकीट दर हे १ जून २०१९ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे यापूर्वी प्रवाशांनी काढलेल्या तिकीटावर किंवा मासिक, त्रैमासिक पास काढलेल्या प्रवाशांना तिकीटाचे अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, १ जून २०१९ पासून काढण्यात येणाऱ्या तिकीट किंवा पाससाठी नवे दर लागू होणार आहेत. 

२०१८-१९ या कालावधीत भारतातील पहिल्या एसी लोकल ट्रेनमुळे रेल्वेला एकूण १९ कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं. एसी लोकल ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. एसी लोकल ट्रेन २५ डिसेंबर २०१७ रोजी सुरु करण्यात आली आणि ३० एप्रिल २०१९ पर्यंत एकूण २४ कोटी रुपयांचं उत्पन्न रेल्वेला मिळालं आहे. सध्य स्थितीत पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि विरार या स्टेशन दरम्यान सोमवार ते शुक्रवार एसी ईएमयू ट्रेनच्या १२ फेऱ्या चालवल्या जातात.

काय असतील नवे दर:

चर्चगेट ते विरार या प्रवासासाठी आधी प्रवाशांना सामान्य तिकीटासाठी २०५ रुपये द्यावे लागत होते ते वाढून आता २२० रुपये होणार आहेत. तर महिन्याच्या पाससाठी आधी २,०४० रुपये द्यावे लागत होते तर नव्या तिकीट दरानुसार प्रवाशांना २,२०५ रुपये मोजावे लागणार आहेत.

  1. चर्चगेट ते प्रभादेवी नव्या तिकीट दरानुसार - ६५ रुपये 
  2. चर्चगेट ते दादर नव्या तिकीट दरानुसार - ९० रुपये 
  3. चर्चगेट ते अंधेरी नव्या तिकीट दरानुसार - १३५ रुपये 
  4. चर्चगेट ते विरार नव्या तिकीट दरानुसार - २२० रुपये 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून 'या' लोकलच्या तिकीट दरात वाढ Description: रेल्वे मंत्रालाने मुंबईकरांना एक झटका दिला आहे. कारण, पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल ट्रेनच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. म्हणजेच आता एसी लोकल ट्रेनचा प्रवास महागणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles