रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

मुंबई
Updated Jul 21, 2019 | 08:26 IST

Mumbai Local Train: तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करता? मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. कारण, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज (२१ जुलै) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठं, किती वाजता ब्लॉक

Local train mega block
लोकल ट्रेन  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
 • मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर मेगाब्लॉक
 • बोरीवली ते भाईंदर दरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. हीच लाईफलाईन सुरळीत सुरू रहावी यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे देखभालीचं आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येतं. आज (२१ जुलै) सुद्धा अशाच प्रकारे काम रेल्वेतर्फे करण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर हे काम होणार असल्याने या मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांच्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील दोन्ही बाजुकडील धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. 

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी जलद लोकल ट्रेन दिवा ते परळ या रेल्वे स्थानकांच्या धीम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास हा जलद मार्गावरुनच करण्यात येणार आहे.

पाहूयात कुठल्या मार्गावर, किती वाजता मेगाब्लॉक

 1. मध्य रेल्वे
  मुलुंड रेल्वे स्थानक ते माटुंगा रेल्वे स्थानक (जलद मार्गावर) 
  सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार

 2. पश्चिम रेल्वे
  बोरीवली ते भाईंदर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान (अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक) 
  सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार 

 3. हार्बर रेल्वे
  सीएसएमटी ते चुनाभट्टी तसेच सीएसएमटी ते वांद्रे या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
  सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर या रेल्वे स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर म्हणजेच अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल ट्रेन या विरार ते बोरीवली या दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर विराच्या दिशेला जाणाऱ्या लोकल ट्रेन या गोरेगाव ते वसई रो या रेल्वेस्थानकां दरम्यान जलद मार्गावरुन सुरू ठेवण्यात येणार आहेत.

लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी आपलं कार्यालय, कॉलेज गाठत असतात. मात्र, तरिही अनेकदा रेल्वे प्रवासा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर येतं. गेल्या बुधवारी सुद्धा मध्य रेल्वेच्या मार्गावर पेंटाग्राफ तुटल्याने जवळपास दोन तास लोकल ट्रेनचा खोळंबा झाला होता. तसेच ऐन गर्दीच्या वेळी सकाळी हा पेंटाग्राफ तुटल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी Description: Mumbai Local Train: तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करता? मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. कारण, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज (२१ जुलै) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठं, किती वाजता ब्लॉक
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...