Mumbai Local Train: धावत्या लोकलमध्ये महिलेसोबत छेडछाड; आरोपीला पकडून प्रवाशांनी धू-धू धुतला आणि...

Mumbai Crime: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेसोबत छेडछाड करण्यात आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जीआरपीने २८ वर्षीय आरोपीला केली अटक
  • कल्याणला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आरोपीने काढली तरुणीची छेड
  • ट्रेनमधील प्रवाशांनी आरोपीला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

Mumbai Local Train updates: मुंबईच्या लोकल ट्रेनचा वापर दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी करत असतात. मुंबई लोकल ट्रेन ही सर्वसामान्यांची एक लाईफलाईन आहे. मात्र, याच लोकल ट्रेनमध्ये एका महिलेसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दादर आणि ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यान घडली आहे. एक व्यक्ती कल्याणला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला आणि त्यानंतर त्याने धावत्या लोकलमध्ये ३२ वर्षीय मुलीची छेड काढली. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने नशा केली होती. (mumbai local train updates youth beaten by passengers after he allegedly molests woman in running train news in marathi)

छेड काढताच पीडित तरुणीने आरडा-ओरड सुरू केला. त्यानंतर लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी या आरोपीला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. मग, आरोपीला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. दादर ते ठाणे या प्रवासा दरम्यान आरोपीने पीडित महिलेची छेड काढली होती. आरोपीच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण कुर्ला रेल्वे पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आले आहे.

अधिक वाचा : दिल्लीतील Spa सेंटरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, मॅनेजर आणि ग्राहकाने केला गँगरेप

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपला पती, भाऊ आणि एका मुलीसोबत लोकलमधून प्रवास करत होती आणि त्यावेली ही घटना घडली. हे कुटुंब दादरला गेले होते आणि तेथून ठाण्याला आपल्या घरी निघाले होते. आरोपी २८ वर्षीय असून भायखळा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचे नाव आफताब आलम नूर मोहम्मद अंसारी असे आहे.

अधिक वाचा : किराणा दुकान चालवणाऱ्याने लग्न जमावे म्हणून राज्यकर उपायुक्त होत असल्याचा केला बनाव, असा झाला उलगडा

आरोपीने सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास नशेत असताना ट्रेन पकडली होती. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, प्रवासा दरम्यान आरोपीने पीडित महिलेला विचारले की, ट्रेनमध्ये मुलीसोबत तू एकटी आहेस का? त्यावेळी पीडित महिलेने म्हटलं की, तिचा पती सुद्धा आहे मात्र, तो याच डब्ब्यात दुसऱ्या दिशेला आहे. त्यानंतर कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन क्रॉस केल्यावर आरोपीने पुन्हा हाच प्रश्न पीडितेला विचारला.

आरोपीने केला अश्लील इशारा

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं की, त्यानंतर तिने आरोपीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. मग तिसऱ्यांदा पुन्हा आरोपी तिच्या कानाजवळ कुजबुजू लागला. मला विचारु लागला काय करत आहे आणि त्यानंतर अश्लील इशारा करत अश्लील हावभाव केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी