Mumbai: आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून बनवला व्हिडिओ अन्...

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 27, 2023 | 14:09 IST

Mumbai Local Train: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. याच लोकल ट्रेनसमोर एका तरुणाने उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

Mumbai local train youth commits suicide in front of running local police recover suicide note crime news marathi
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धावत्या ट्रेन समोर तरुणाने उडी घेत केली आत्महत्या
  • मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घटना
  • आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बनवला होता एक व्हिडिओ

Crime News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ (Ambernath) आणि बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकादरम्यान एका तरुणाने धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती तसेच एक व्हिडिओ सुद्धा तयार केला होता. हा व्हिडिओ पोलिसांना आढळून आला आहे. (Mumbai local train youth commits suicide in front of running local police recover suicide note crime news marathi)

पोलिसांच्या मते, ऑफिसमधील काही जणांच्या तक्रारीनंतर त्या मृतक व्यक्तीची नोकरी गेली होती. त्या व्यक्तीवर कर्ज सुद्धा होते. या कर्जाचे पैसे मिळावे यासाठी त्या तरुणावर सातत्याने दबाव वाढला जात होता. यामुळेच या तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं.

हे पण वाचा : बोर खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे

मृतक हा 35 वर्षीय होता आणि त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे स्धानकांदरम्यान बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

हे पण वाचा : थंडीत खा आवळा अन् आजार पळवा

कल्याण रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश यांनी सांगितले की, गिरीश नंदलाल चुबे अशी मृतकाची ओळख पटली आहे. पोलिसांच्या तपासात घटनास्थळावरुन एक सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींचे नाव आहेत. या व्यक्तींमुळेच आपण आत्महत्या केल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं.

हे पण वाचा : कोणत्या वेळी कोणते फळ खाणे फायद्याचे? वाचा

नोकरी गेली आणि एक लाखाचं कर्ज

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक व्यक्तीने एक व्हिडिओ क्लिप तयार केली आहे. ज्यामध्ये त्याने दोन सहकाऱ्यांकडून कंपनीच्या मालकाला तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर त्याला नोकरी सोडावी लागली. तर काही जणांकडून त्याने एक लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. हातातील नोकरी गेली आणि कर्जाची परतफेड करायची होती यामुळे तो त्रस्त झाला होता. या क्लिपमध्ये त्याने दोन जणांची नावे घेतली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी