लोकल कधी सुरू होणार, आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

mumbai local trains may start by mid october says aaditya thackeray लोकल कधी सुरू होणार या प्रश्नाला पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.

mumbai local trains may start by mid october says aaditya thackeray
लोकल कधी सुरू होणार? 

थोडं पण कामाचं

  • लोकल कधी सुरू होणार, आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर
  • ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून
  • लोकल सेवा आणि मुंबईतील सर्व ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार

मुंबईः महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (corona recovery rate) ७८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोना संकटावर बऱ्याचअंशी नियंत्रण मिळवले असल्यामुळे राज्याचा कारभार वेगाने सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राजधानी मुंबईचा (mumbai) कारभार 'ट्रॅक'वर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून लोकल सेवा आणि मुंबईतील सर्व ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. रेल्वे सेवेबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय राखून काम करत आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी दिली. (mumbai local trains may start by mid october says aaditya thackeray)

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना हा मुख्य घटक पक्ष आहे. सेनेचे युवा नेतृत्व अशी आदित्य ठाकरेंची ओळख आहे. तसेच ते मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत. याच कारणामुळे आदित्य यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे. 

कोरोना संकट सुरू झाल्यापासून लोकलच्या वाहतुकीत प्रचंड बदल झाला आहे. सध्या लोकलमधून फक्त केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आणि बँक कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी आहे. 

पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावर ५०६ आणि मध्य रेल्वे (central railway) मार्गावर ४२३ लोकल फेऱ्या सुरू आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरती सकाळी ७.३५ची विरार-चर्चगेट आणि संध्याकाळी ६.१०ची चर्चगेट-विरार या दोन लोकल फेऱ्या महिला विशेष म्हणून सुरू आहेत. महिला विशेष व्यतिरिक्त नव्या व्यवस्थेत १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे ३ डबे राखीव असतात. या व्यतिरिक्त ३ प्रथम श्रेणी डब्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आसने राखीव असतात. 

मर्यादीत लोकल असल्यामुळे अद्याप अनेकांना मुंबईतले ऑफिस गाठण्यासाठी दररोज एक किंवा त्यापेक्षा जास्त बसमधून प्रवास करावा लागतो. अनेकांना घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा दररोज किमान ३-४ तास प्रवास करावा लागत आहे. लोकल सुरू होईपर्यंत नागरिकांचे हाल सुरू राहणार आहेत. याच कारणामुळे मनसेने लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करा नाही तर मुंबई आणि आसपासच्या सर्व शहरांतील पालिकांची बस वाहतूक तसेच राज्य परिवहनच्या एसटी यांच्या फेऱ्या वाढवून नागरिकांची सोय करण्याची मागणी केली होती. लोकलवरुन राजकारण पेटत असताना आदित्य यांनी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. 

लोकल सेवा ही मुंबईची लाइफलाइन आहे. ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर मुंबईच्या कारभाराला गती येईल. ही बाब लक्षात घेऊन सरकार ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून लोकल सेवा आणि मुंबईतील सर्व ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा विचार करत आहे. अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याची परवानगी दिली. यंदा नवरात्रौत्सव १७ ऑक्टोबरपासून आहे. याआधी कोविड प्रोटोकॉलसह रेस्टॉरंट, बार आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेपाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी लोकल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी