मध्य आणि हार्बर मार्गावर २१ फेब्रुवारीच्या रविवारी मेगाब्लॉक

MUMBAI LOCAL TRAINS MEGA BLOCK / JUMBO BLOCK February 21 2021 देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर २१ फेब्रुवारी रोजी रविवारी मेगाब्लॉक आहे.

MUMBAI LOCAL TRAINS MEGA BLOCK / JUMBO BLOCK February 21 2021
मध्य आणि हार्बर मार्गावर २१ फेब्रुवारीच्या रविवारी मेगाब्लॉक 

थोडं पण कामाचं

  • मध्य आणि हार्बर मार्गावर २१ फेब्रुवारीच्या रविवारी मेगाब्लॉक
  • पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा नसेल मेगाब्लॉक
  • प्रवाशांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करत प्रवास करावा - रेल्वे प्रशासन

मुंबईः देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर २१ फेब्रुवारी रोजी रविवारी मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर २२ फेब्रुवारीच्या रात्रीपासून २३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत जम्बोब्लॉक असल्यामुळे रविवारी दिवसा प्रवाशांना मेगाब्लॉकला सामोरे जावे लागणार नाही. वांद्रे टर्मिनस यार्ड या ठिकाणी पश्चिम रेल्वे मार्गावर २२ फेब्रुवारीच्या रात्रीपासून २३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत जम्बो ब्लॉक आहे. (MUMBAI LOCAL TRAINS MEGA BLOCK / JUMBO BLOCK February 21 2021)

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ वाजून ५ मिनिटे ते संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटे या कालावधीत मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या जलद लोकल फेऱ्या धिम्या मार्गावर धावतील आणि नियोजीत स्टेशनवर थांबतील. या बदलामुळे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने या लोकल स्टेशनवर पोहोचतील. 

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी अप डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटे या कालावधीत मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला आणि वाशी, पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. 

मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकरिता रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कोविड प्रोटोकॉलनुसार मुंबईत सशर्त स्वरुपात सर्वांसाठी लोकल सुरू आहे. दररोज पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी सात पर्यंत, दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वांना प्रवासाची मुभा आहे. महिला प्रवाशांना सर्वांसाठी असलेल्या कालावधीत तसेच सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा आहे. इतर वेळांमध्ये राज्य शासनाने ज्यांना परवानगी दिली आहे त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे. पण ही सेवा सुरू झाल्यापासून मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. लोकलमध्ये गर्दीच्या वेळी मास्क न घालता प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या घटनेची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.

नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टंस राखावा, वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, आरोग्याची काळजी घ्यावी, अधूनमधून हात साबण आणि शुद्ध पाण्याने धुवावे अथवा सॅनिटायझर वापरुन स्वच्छ करावे; असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्रात ४४ हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १० हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महामुंबईत आहेत. यामुळे लोकल प्रवास करताना कोविड प्रोटोकॉलचे तसेच रेल्वेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि स्वच्छता राखावी; असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी