Mumbai and Maharashtra rain news updates: राज्याच्या विविध भागांत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईसह इतरही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचल्याचंही पहायला मिळत आहे. त्याच दरम्यान आता पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Maharashtra rain updates imd issued heavy rainfall warning yellow and orange alert)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत राज्यातील काही भागांत पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमी होऊन पावसाचा जोरही कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक, रायगड, पुणे, सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
Maharashtra 24 hrs rainfall warnings pic.twitter.com/BmRt7dVIqd — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2022
हवामान विभागाने सात जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : Jammu and Kashmir: जवानांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल, बस नदीत कोसळून 6 जवान शहीद; 30 जखमी
कोकण - १६ ऑगस्ट - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र - १६ ऑगस्ट - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा - १६ ऑगस्ट - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
विदर्भ - १६ ऑगस्ट - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
अधिक वाचा : Vinayak Mete Death: 3 ऑगस्टलाही मेटेंचा अपघात करण्याचा झाला होता प्रयत्न; ऑडिओ क्लिप व्हायरल
कोकण - १७ ऑगस्ट - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र - १७ ऑगस्ट - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाडा - १७ ऑगस्ट - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
विदर्भ - १७ ऑगस्ट - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१६ ऑगस्ट - आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).
१७ ऑगस्ट - आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.