Maharashtra Rain updates: पुढील ४८ तास मुसळधार पावसाचे; अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 09, 2022 | 21:28 IST

Maharashtra weather forecast: राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला असून पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुढील ४८ तासांत राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  • राज्यातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता 
  • राज्यातील ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

Maharashtra Rain news updates: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, आता मान्सून पुन्हा एकदा राज्यात सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (mumbai Maharashtra rain updates imd issued warning of heavy to heavy rainfall in some districts in next 48 hrs havaman news in marathi)

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, "येत्या 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसासह काही ठिकाणी अतीवृष्टीचे इशारे. पुढचे 2, 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय."

९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १० ऑगस्ट रोजी राज्यातील ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर गडचिरोली या एका जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

अधिक वाचा : मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पाणीसाठा

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

१० ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. 

मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

११ ऑगस्ट

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 

मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. 

मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी