Mumbai Crime: ग्रँटरोडमध्ये माथेफिरूचा 5 जणांवर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, घटनेचा Shocking VIDEO VIRAL

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 24, 2023 | 19:12 IST

Shocking video of man attacked on 5 people with sharp knife: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने पाच जणांवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Mumbai man allegedly attack on 5 people with sharp knife in grant road 2 people dead shocking video viral
Mumbai Crime: ग्रँटरोडमध्ये माथेफिरूचा 5 जणांवर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, घटनेचा Shocking VIDEO VIRAL 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील धक्कादायक घटना
  • ग्रँटरोडमध्ये माथेफिरूकडून चाकू हल्ला
  • हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी

Man allegedly attacked on five people at grand road in mumbai: मुंबईतील ग्रँटरोड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्रँटरोड परिसरातील एका इमारतीत माथेफिरूने चाकू हल्ला केला आहे. पाच जणांवर धारदार चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. (Mumbai man allegedly attack on 5 people with sharp knife in grant road 2 people dead shocking video viral)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्रँटरोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या शेजारील पाच जणांवर चाकू हल्ला केला. शुक्रवारी (24 मार्च 2023) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास चेतन गाला या व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर धारदार चाकूने हल्ला चढवला.

हे पण वाचा : लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे आणि उपाय

चेतन गाला या व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबत वाद होत होते. आपल्या पत्नीसोबत होणाऱ्या वादासाठी शेजारी कारणीभूत आहेत असे चेतन यांना वाटत होते. शेजारचे आपल्या पत्नीला भडकवतात आणि त्यामुळेच पत्नीसोबत वाद होतात असे चेतन गाला यांना वाटत होते. याच कारणावरुन चेतन गाला यांचा शेजारच्यांसोबत वाद होत होता. त्यानंतर शुक्रवारी याच रागातून चेतन गाला यांनी शेजारील 5 जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

हे पण वाचा : गरोदरपणात कारले खावे की नाही?

ही घटना भरदुपारी इमारतीच्या गॅलरीत घडली. याचं चित्रिकरण इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केलं होतं.

हे पण वाचा : काय बोलता! हेअर जेल वापरल्याने केस गळतात?

स्थानिक नागरिक घटना होत असताना ओरडत होते मात्र, चेतन गाला यांनी कुणालाही न जुमानता शेजारच्यांवर सपासप वार केले. आरोपीच्या हातातील चाकू पाहून कुणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चेतन गाला याला अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी