Mumbai: पत्नीने जवळ झोपू देण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 17, 2022 | 15:02 IST

Mumbai Crime News: मुंबईतील पश्चिम उपनगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने पतीच्या शेजारी झोपण्यास नकार दिला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. 

Mumbai man killed wife by hitting stone after she denied to sleep beside him crime news marathi
Mumbai: पत्नीने जवळ झोपू देण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील मालाड परिसरातील घटना
  • पत्नीने पतीच्या शेजारी झोपण्यास नकार दिल्याने पतीचा राग अनावर

मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीच्या शेजारी झोपण्यास नकार दिला (wife denied to sleep beside husband) आणि त्यामुळे पती चांगलाच संतापला. संतापलेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारला आणि यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. शुक्रवारी (१५ जुलै) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Man killed wife after she denied to sleep with him in Malvani Malad area of Mumbai)

न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, एकमेकांच्या शेजारी झोपवण्यावरुन दोघांमध्ये सुरुवातीला वाद झाला. हा वाद इतका वाढला की, पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड मारला. दगडाचा घाव इतका गंभीर होता की, पत्नीचा यामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

मुंबईतील मालवणी परिसरात असलेल्या यशोदीप सहकारी सोसायटीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ४८ वर्षीय विजयमाला या आपला पती ज्ञानोबा बलाडे याच्यासोबत राहत होत्या. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विजयमाला यांनी आपल्या पतीच्या शेजारी झोपण्यास नकार दिला. यामुळे ज्ञानोबा चांगलाच संतापला आणि त्याने विजयमाला यांच्या डोक्यात दगड मारला.

हे पण वाचा : अचानक ट्रॅकवर पडला व्यक्ती,तितक्यात वेगाने आली ट्रेन आणि...

दगडाचा घाव इतका गंभीर होता की, विजयमाला यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी ज्ञानोबा याला अटक केली आहे. पोलीस ज्ञानोबा याची चौकशी करत आहेत. तर विजयमालाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मालाडमध्ये २४ तासांत दोन हत्या

मालाड-मालवणी परिसरात गेल्या २४ तासांत दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. हत्येच्या या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मालवणीतील अंबोडवाडी येथे एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली. काही वादानंतर एका अल्पवयीन मुलाने तौसीफ नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तौसीफ खान हा गंभीर जखमी झाला. भरपूर रक्तस्त्राव झाल्याने तौसीफ याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी