Mumbai : दसरा मेळाव्यामुळं वाहतुकीत बदल! हे रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

Mumbai Traffic Update:मुंबई ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या प्रमुख रस्त्यांवर जड वाहतूक अपेक्षित असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीकेसी, दादर आणि माहीममध्ये वाहतूक निर्बंध लागू केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Mumbai: Many major roads will remain closed due to Shiv Sena and Shinde faction's Dussehra rally, Mumbai Traffic Police has issued an advisory.
Mumbai :दसरा मेळाव्यामुळं वाहतुकीत बदल! हे रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे वाहतूक पोलिसांनी अॅडव्हायझरी जारी केली
  • मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.
  • पश्मिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची वाहतूक वळवली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने उद्या (५ ऑक्टोबर)चा दिवस अतिशय खास आहे. बुधवारी मुंबई शहरात दोन भव्य दसरा मेळावा होणार आहे. एक मेळावा शिवसेनेतर्फे दादरच्या शिवाजी पार्कवर तर दुसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने बाहेरील लोक शहरात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यामुळे शहरातील वाहतूक बंदीबाबत माहिती देण्यात आली आहे. (Mumbai: Many major roads will remain closed due to Shiv Sena and Shinde faction's Dussehra rally, Mumbai Traffic Police has issued an advisory.)

अधिक वाचा : Maharashtra Cabinet Decision : सरकारकडून दिवाळी भेट; रेशनवर 100 रुपयांना मिळणार रवा, तेल, साखर आणि चना डाळीचे पॅकेट

मुंबईच्या मुख्य रस्त्यावर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्राफिक होणार असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीकेसी, दादर आणि माहीम येथे वाहतूक निर्बंध लागू केल्याची माहिती दिली आहे. हे निर्बंध सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत लागू असतील.

वांद्रे कुर्ला

  • कुर्ल्याकडे पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वांद्रे-वरळी सीलिंकच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.
  • त्याचवेळी संत ज्ञानेश्वर रोडकडून बीकेसी इन्कम टॅक्स जंक्शनकडून कुर्ल्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. 
  • तसेच शासकीय वसाहत, कनकिया पॅलेस आणि वाल्मिकी नगर येथून बीकेसी संकुलाकडे चुनाभट्टी आणि कुर्ल्याकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.
  • सुर्वे जंक्शन आणि रज्जाक जंक्शन येथून पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वांद्रे-वरळी सीलिंकच्या दिशेने बीकेसी कॉम्प्लेक्सकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
  • दक्षिणेकडील BKC कनेक्टरचा वापर करून चुनाभट्टी मार्गे BKC येथे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून येणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश बंद राहील.


दादर

  • मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन माहीमपर्यंत एसव्हीएस रोडवर नो एन्ट्री होणार आहे. त्याचप्रमाणे राजा बधे चौक जंक्शन ते केळुसकर मार्ग (उत्तर) जंक्शन, दादरपर्यंत वाहनांना प्रवेश नसेल.
  • पांडुरंग नायक मार्गावरील जंक्शनपासून दिलीप गुप्ते रोडवरील प्रवेश दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद राहील. राजा बडे जंक्शनपासून एलजे रोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश मिळणार नाही.
  • दादासाहेब रेगे रस्त्यावर सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शनपर्यंत प्रवेश मिळणार नाही आणि पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन ते एलजे मार्ग (माहीम) बाळ गोविंददास मार्गाने प्रवेश बंद राहील. मुंबईतील इतर बंद रस्ते आणि वळवलेल्या मार्गांचे तपशील जाणून घेण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी