Mumbai Fire : मुंबईत २० मजली इमारतीला आग ६ ठार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 22, 2022 | 18:10 IST

Mumbai: Massive fire breaks out in 20-storey building, rescue underway : मुंबईत ताडदेव परिसरात भाटिया हॉस्पिटल जवळच्या कमला या २० मजली इमारतीच्या अठराव्या मजल्यावर लागलेली आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला.

Mumbai: Massive fire breaks out in 20-storey building, rescue underway
Mumbai Fire : मुंबईत २० मजली इमारतीला आग ६ ठार 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत २० मजली इमारतीला आग ६ ठार
  • अनेकजण जखमी, जखमींना हॉस्पिटलमध्ये केले दाखल
  • आग प्रकरणी चौकशी होणार

Mumbai: Massive fire breaks out in 20-storey building, rescue underway : मुंबई : मुंबईत ताडदेव परिसरात भाटिया हॉस्पिटल जवळच्या कमला या २० मजली इमारतीच्या अठराव्या मजल्यावर लागलेली आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. अग्नीशमन दलाच्या तेरा गाड्या आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मदतकार्य पण वेगाने सुरू आहे.

आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त होत आहे. आग प्रकरणी सखोल चौकशी होईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होईल; अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. इमारतीमध्ये अग्नीसुरक्षा व्यवस्था होती की नव्हती आणि असल्यास त्या यंत्रणेची स्थिती काय होती याबाबतही चौकशी होईल; असे महापौरांनी सांगितले.

जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्यांवर होणार कारवाई

इमारतीला आग लागल्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांपैकी काही जणांना जवळच्या हॉस्पिटलमधून दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. यामुळे उपचार सुरू होण्यास वेळ लागला आणि मृतांच्या संख्यत वाढ झाली असे वृत्त येत आहे. या प्रकरणी चौकशी करून खरच जखमींना दाखल करुन घेण्यास कोणत्याही हॉस्पिटलने नकार दिला असेल तर संबंधित हॉस्पिटलवर कारवाई होईल; असे राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्यावतीने सांंगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी