Kishori Pednekar । मुंबई महापौर संतापल्या, भाजपवर केला पलटवार, हत्तीला' चिवा' तर माकडाला 'चंपा'' नाव देणार

Penguin name issue । राणीच्या बागेतील पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावर आता राज्यात राजकारण रंगत आहे. मराठीचा कळवळा असलेल्या शिवसेनेने पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजपने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चिमटा काढला. त्यावर लगेच महापौरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

Mumbai mayor angry, retaliates against BJP, names elephant 'Chiva' and monkey 'Champa' । Political news in marathi
Kishori Pednekar । मुंबई महापौर संतापल्या, भाजपवर पलटवार 
थोडं पण कामाचं
  • राणीच्या बागेतील पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावर आता राज्यात राजकारण रंगत आहे.
  • मराठीचा कळवळा असलेल्या शिवसेनेने पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजपने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चिमटा काढला.
  • भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्विट करून महापौर यांना पेंग्वीनच्या इंग्रजी नावावरून चिमटा काढला होता.

मुंबई :  राणीच्या बागेतील पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावर आता राज्यात राजकारण रंगत आहे. मराठीचा कळवळा असलेल्या शिवसेनेने पेंग्वीनचे नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजपने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चिमटा काढला. त्यावर लगेच महापौरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अधिक वाचा : Daily News Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी; जाणून घ्या कधी , कुठे काय घडलं

भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्विट करून महापौर यांना पेंग्वीनच्या इंग्रजी नावावरून चिमटा काढला होता. त्याला प्रत्युत्तर देताना महापौर म्हणाल्या, आता मराठीच नाव हवे असेल तर एक हत्तीचे पिल्लू राणीच्या बागेत येणार आहे. त्याचे नाव आपण 'चिवा' ठेवू या आणि माकडीलाही बाळ होणार आहे त्याचे नाव 'चंपा' ठेवू या. भाजप आता टीका करत आहेत तर ही नावे मराठीच आहे. तर ठरल मग असेच नामकरण करू या असे महापौर पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

काय केले होतं ट्वीट चित्रा वाघ यांनी

#मराठीचा पुळका देखाव्या पुरता !  असे लिहीत एक कार्टुन ट्विट केले होते.  त्यात लिहिले होते की मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेंग्वीनचं इंग्रजीत नाव? 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी