मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं कोरोनाने निधन 

Kishori Pednekar brother Sunil Kadam dies: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा भाऊ सुनिल कदम यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे.

BMC mayor Kishori Pednekar
मुंबई माहापौर किशोरी पेडणेकर  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC)  क्षेत्रात कोरोनाचा असलेला विळखा आता हळूहळू सैल होत चालला आहे. मात्र, त्याच दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण, मुंबई महानगरपालिकेच्या माहपौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनिल कदम (Sunil Kadam) यांचे निधन झाले आहे. सुनिल कदम यांना कोरोनाचा संसर्ग (Covid-19 infecion) झाला होता.

सुनिल कदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र, आज (१ ऑगस्ट २०२०) रोजी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास सुनिल कदम यांचे निधन झाले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मोठ्या भावाच्या निधनानंतर ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये किशोरी पेडणेकर यांनी भावनिक कविता लिहिली आहे. 
आपल्या पोस्टमध्ये किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे, 

"लढला असेल शेवटपर्यंत 
पण कुठे तरी तो थकला... 
पण तुम्ही कोण ठरवणारे 
तो परिस्थितीसमोर वाकला... 

घेत होता भरारी उंच नभात 
पण कुठेतरी आभाळ फाटलं... 
पण तुम्ही कोण ठरवणारे 
त्याला जगावंस नाही वाटलं... 

सुनील तुझी आठवण......"

मुंबईतील कोरोनाची स्थिती

कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं मुंबई शहर आता हळूहळू कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येत आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७६ टक्के इतके झाले आहे. ३१ जुलै २०२० च्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण ८७,०७४ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या स्थितीत एकूण २०,५६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी