मुंबईत गोवरमुळे 10 मृत्यू, गोवरबाधितांची संख्या 208 वर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 22, 2022 | 11:22 IST

Mumbai Measles Disease News, 10 deaths due to measles in Mumbai, 208 measles infected in Mumbai : मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराचे संकट वाढल्याचे चित्र आहे. गोवंडीत सव्वा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत 10 मृत्यूची नोंद झाली.

Mumbai Measles Disease News
मुंबईत गोवरमुळे 10 मृत्यू, गोवरबाधितांची संख्या 208 वर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत गोवरमुळे 10 मृत्यू, गोवरबाधितांची संख्या 208 वर
  • गोवंडीत सव्वा वर्षांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू
  • गोवर लसीकरण

Mumbai Measles Disease News, 10 deaths due to measles in Mumbai, 208 measles infected in Mumbai : मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराचे संकट वाढल्याचे चित्र आहे. गोवंडीत सव्वा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत 10 मृत्यूची नोंद झाली. तसेच मुंबईत सोमवार 21 नोव्हेंबर 2022 नव्या 24 गोवर रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या गोवरबाधितांची संख्या 208 झाली आहे. सोमवार 21 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत उपचार घेत असलेल्यांपैकी 22 जणांना तब्येत सुधारल्यामुळे घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्न करत आहे.

गोवंडीत सव्वा वर्षांच्या मुलीला 3 नोव्हेंबर 2022 तीव्र ताप, खोकला यांचा त्रास झाला. नंतर 5 नोव्हेंबर 2022 रोजी तिच्या अंगावर पुरळ उठले. तब्येत बिघडल्यामुळे तिला 11 नोव्हेंबर 2022 रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तब्येत खालावल्यामुळे मुलगी 13 नोव्हेंबर 2022 पासून व्हेंटिलेटरवर होती. तिच्यावर ICUमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत होते. पण गोवरमुळे हृदय निकामी झाले आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी मुलीचा मृत्यू झाला. या मुलीवर आधी पाच महिन्यांची असताना एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

गोवर हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होणारा आजार आहे. यामुळे मुलांच्या लसीकरणाची गती वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील दोन आठवड्यात मुंबईत जास्तीतजास्त मुलांना गोवर प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईतील 10 पेक्षा कमी वयाच्या ज्या मुलांना गोवर प्रतिबंधक लस टोचण्यात आलेली नाही त्यांच्या पालकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  1. मुंबईत गोवरमुळे मृत्यू - 10
  2. मुंबईत आढळलेले गोवरबाधित रुग्ण - 208
  3. मुंबईत आढळलेले संशयित गोवरबाधित रुग्ण - 3208

मुंबईत गोवरची साथ, अफवांमुळे पालकांनी नाकारले होते लसीकरण

श्रद्धा मर्डर केस प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार

गोवरची लक्षणे

गोवरची चार प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसून येतात. यावेळी 104 अंशांपर्यंत उच्च ताप, खोकला, वाहती सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे अशी सुरूवातीची   लक्षणे दिसतात. त्यावेळीच 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होण्यास सुरूवात होते आणि  3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलांच्या चेहऱ्यावर, मानेवर, हात-पाय आणि तळव्यांना येऊ शकतो. तसंच गोवर लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्ग आहे. त्यामुळे त्यावर वेळेवर उपचार घ्यावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी