Mega Block : आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा डाऊन फास्ट मार्गावर आज १२.४० ते ५.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रविवार सकाळपासून पहाटे ५.२० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघणाऱ्य़ा फास्ट गाड्या भायखळा ते माटुंगा दरम्यान स्लो मार्गावर धावतील. तसेच या गाड्या १० मिनिटे उशीराने धावतील.

mega block
मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
  • मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा डाऊन फास्ट मार्गावर आज १२.४० ते ५.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • या गाड्या १० मिनिटे उशीराने धावतील.

Mumbai Local Mega Block : आज मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा (Byculla To Matunga) डाऊन फास्ट (Down fast) मार्गावर आज १२.४० ते ५.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  आज रविवार सकाळपासून पहाटे ५.२० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून(chhatrapati shivaji maharaj terminus) निघणार्‍या फास्ट गाड्या (Fast Train) भायखळा ते माटुंगा (Byculla to Matunga) दरम्यान स्लो मार्गावर धावतील. तसेच या गाड्या १० मिनिटे उशीराने धावतील.

अधिक वाचा : रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात आठवणींना उजाळा, कार्यकाळातील या घटना अविस्मरणीय

एक्सप्रेस गाड्या दुसर्‍या मार्गावर

ट्रेन क्रमांक १२०५१ सीएसएमटी-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी भायखळा ते माटुंगा स्थानक दरम्यान स्लो मार्गावर वळवण्यात येईल. तसेच ही गाडी दादरच्या फलाट क्रमाकंवर दोन वेळा थांबेल आणि १५ ते १५ मिनिटांनी धावेल. ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस, ११०२०  कोणार्क एक्सप्रेस आणि १२८१० हावडा-सीएसएमटी मेल नागपूर हून येऊन या गाड्या भायखळा ते माटुंगा दरम्यास स्लो मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या दादरच्या फलाट क्रमांक तीनवर दोनवेळा थांबेल आणि आपल्या गंतव्य ठिकाणी १० ते १५ मिनिट उशीराने धावेल. 

अधिक वाचा : New Taliban dictate : तालिबानचा नवा फतवा, सरकारवर टीका केली तर होणार कडक शिक्षा

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत रेल्वे सेवा बंद राहील. तसेच सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन ते पनवेल/बेलापूर पर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार आहे. पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार आहे. तसेच ठाणे ते पनवेल सकाळी १०.०१ ते  दुपारी ३.२० पर्यंत रेल्वेसेवा बंद असणार आहे.

अधिक वाचा : Covid Update: कोरोना पुन्हा घाबरावयला लागला! एका दिवसात इतके रुग्ण, ॲक्टिव केसेचा ग्राफ दीड लाखांच्या पुढे गेला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी