मुंबई : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 20, 2022 | 06:52 IST

Mumbai: Megablock on all three railway lines on Sunday : रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या कालावधीतील वेळापत्रक समजून घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai: Megablock on all three railway lines on Sunday
मुंबई : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
  • मध्य रेल्वेचा (मेन लाईन आणि हार्बर लाईन) भायखळा ते माटुंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक
  • पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते कांदिवली दरम्यान ब्लॉक

Mumbai: Megablock on all three railway lines on Sunday : मुंबई : रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या कालावधीतील वेळापत्रक समजून घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य रेल्वेने (मेन लाईन आणि हार्बर लाईन) भायखळा ते माटुंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते कांदिवली दरम्यान ब्लॉक आहे. 

मध्य रेल्वे मुख्य मार्ग (सेंट्रल रेल्वे मेन लाईन)
भायखळा ते माटुंगा मेगाब्लॉक
सकाळी १२.४० ते संध्याकाळी ५.४० या वेळेत मेगाब्लॉक
अप आणि डाऊन फास्ट मार्गावर मेगाब्लॉक

शनिवार रात्री ११ ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. तसेच रविवारी दिवसादेखील ब्लॉक असेल. ब्लॉकच्या वेळेत जलद (फास्ट) मार्गावरील लोकलफेऱ्या धीम्या (स्लो) मार्गावर वळविण्यात येणार. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द होतील. काही लोकल विलंबाने धावतील.

मध्य रेल्वे हार्बर मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मेगाब्लॉक
सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० मेगाब्लॉक
अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकलफेऱ्या रद्द. गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द. पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल २० मिनिटांच्या फरकाने धावतील.

पश्चिम रेल्वे
बोरिवली ते कांदिवली दरम्यान ब्लॉक
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत अप आणि डाऊन धीम्या (स्लो) मार्गावर ब्लॉक

ब्लॉक काळात धीम्या (स्लो) मार्गावरील लोकल फेऱ्या जलद (फास्ट) मार्गावरून धावणार. काही लोकल फेऱ्या रद्द आणि काही लोकल विलंबाने धावणार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी