Mumbai Mega Block on Central Railway : सोमवारच्या मध्यरात्रीपर्यंत मेगाब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 19, 2021 | 08:08 IST

आज रविवारी (Sunday) सकाळी 8 वाजल्यापासून सोमवारच्या (Monday) मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर (Central Railway)18 तासांचा मेगाब्लॉक (MegaBlock) असणार आहे.

Mumbai Mega Block on Central Railway
सोमवारच्या मध्यरात्रीपर्यंत Mega Block   |  फोटो सौजन्य: Indiatimes

Sunday MegaBlock : मुंबई : आज रविवारी (Sunday) सकाळी 8 वाजल्यापासून सोमवारच्या (Monday) मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर (Central Railway)18 तासांचा मेगाब्लॉक (MegaBlock) असणार आहे. पाचव्या, सहाव्या मार्गांसाठी दिवा-ठाणे (Diva-Thane) स्लो मार्गावरील वाहतूक बंद (Transport) करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर आज 18 तासांचा 'जम्बो ब्लॉक' घेण्यात येणार आहे. ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गाचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

आज सकाळी 8 वाजल्यापासून ते उद्या मध्यरात्री 2 वाजेपर्यंत स्लो मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहील. त्यामुळे सर्व लोकल दिवा आणि मुलुंडदरम्यान फास्ट मार्गावरून जातील. त्यामुळे मुंब्रा तसंच कळवा स्थानकांवर लोकल उपलब्ध नसतील.

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्यात. जाणून घ्या

11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
 12109/12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
 12071/12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
 11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
 12123/12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
 12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस
 11139 मुंबई-गदग एक्सप्रेस
 17612 मुंबई-नांदेड़ एक्सप्रेस
 11029 मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस

दिनांक 20.12.2021 (सोमवार) या एक्सप्रेस ट्रेन रद्द 

 11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
 11140 गडग-मुंबई एक्सप्रेस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी