Mumbai Megha block : मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवसांचा जंबो ब्लॉक, अनेक लोकल फेऱ्या रद्द

Mumbai Local Train Latest Update : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून तीन दिवसांचा मध्यरेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक आहेत.

Mumbai Megha block: Three-day block on Central Railway line, many local trains cancelled
Mumbai Megha block : मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल फेऱ्या रद्द  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मध्यरेल्वे मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लाॅक
  • ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत
  • सकाळी 10.50 ते 3.45 या वेळेत हा विशेष ब्लॉक लागू असेल.

Mumbai Megha block Update : मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आजपासून मध्य रेल्वेवर तीन दिवसांचामेगाब्लॉक असणार आहे. म्हणजेच 12 ते 14 एप्रिलपर्यंत हा मेगाब्लॉक चालणार आहे. यादरम्यान मध्य मार्गावरील अनेक मुंबई लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द राहतील. (Three-day block on Central Railway line, many local trains cancelled)

अधिक वाचा : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यात खलबतं; सिल्व्हर ओकवर बंद दाराआड काय झाली चर्चा?

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही रेल्वे झोन अंतर्गत रेल्वे ट्रॅकच्या देखभालीच्या कामांसाठी आणि इतर संबंधित कामांसाठी मेगा ब्लॉक  करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने 12.04.2023 रोजी कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावरील घाट विभागावर आणि कर्जतपर्यंत सकाळी 10.50 ते दुपारी 1.50 पर्यंत OHE संरचना उभारण्यासाठी आणि लोड ट्रान्सफरसाठी सीआर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालविण्याची घोषणा केली आहे.

अधिक वाचा : Eknath Shinde Death Threat: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

मध्य रेल्वे 14.04.2023 रोजी कर्जत यार्ड फेरफार आणि कर्जत पर्यंत ओएचई संरचना उभारण्यासाठी आणि लोड हस्तांतरणाच्या संदर्भात कर्जत स्थानकावरील घाट विभागावर दुपारी 1.45 ते 3.45 पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक देखील चालवला जाणार आहे

 मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्या रद्द? 

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी