Mumbai Metaverse : ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे दर्शन घडवेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 07, 2023 | 07:56 IST

'Mumbai Metaverse' initiative will give citizens a glimpse of a changing Mumbai says Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुंबई बदलत आहे. ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Mumbai Metaverse
‘मुंबई मेटाव्हर्स’ बदलत्या मुंबईचे दर्शन घडवेल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ‘मुंबई मेटाव्हर्स’ बदलत्या मुंबईचे दर्शन घडवेल
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
  • ‘मुंबई मेटाव्हर्स’चे सादरीकरण बघून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

'Mumbai Metaverse' initiative will give citizens a glimpse of a changing Mumbai says Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुंबई बदलत आहे. ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘मुंबई मेटाव्हर्स’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सौरव विजय, ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे तसेच ‘मुंबई मेटाव्हर्स’चे सदस्य उपस्थित होते.

मुंबईतील विविध विकास प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ते दृश्य स्वरूपात कसे असतील, त्यांचा एकत्रित परिणाम कसा असेल याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

सादरीकरण बघितल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई बदलत आहे. मुंबई महानगराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि संपूर्ण मुंबई अधिक दर्शनीय करण्याच्या दृष्टीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई साकारायची आहे. यातील अनेक प्रकल्प आकारास येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल. या प्रकल्पाव्दारे नागरिकही विकासकामांत सक्रियपणे सहभागी होऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Holi DP : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसाठी होळी डीपी । अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात

Ghee Purity Check Tips : तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याचे तंत्र । खऱ्याखोट्या मनुका तपासण्याचे तंत्र

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी