Mumbai Metro News: मुंबई : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून सुरू होणार्या मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) आणि लिंक रोड ते लाईन २ ए (दहिसर ते डी एन नगर) या दोन्ही मार्गावरील ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई मेट्रोपॉलिटिन रिजन डेव्हलपमेंटने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत या मार्गावर ट्रायल रन होण्याची शक्यता आहे. (mumbai metro 2a and line 7 98 percent work trial run in October end )
मिळालेल्या माहितीनुसार एमएमआरडीएने ही २० किमीचा हा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू केला होता. या मार्गावर दररोज ३० हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे एमएमआरडीएने सांगितले आहे. जेव्हा या मेट्रोचे दोन्ही मार्ग सुरू होतील तेव्हा या मार्गावरून ३ लाख दररोज प्रवासी प्रवास करतील असा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केल आहे या मार्गावर मेट्रोचे ३० स्थानकं असतील. त्या शिवाय नवीन मेट्रो लाईन २ए आणि ७ मेट्रो वनला जोडली जाईल. सध्या मेट्रो वन घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान सुरू आहे.
या शिवाय एमएमआरडीने प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोल लाईन ७वर गोरेगाव स्थानकादरम्यान एक फूटओव्हर ब्रिज बांधणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगराचे प्रवासी या मेट्रोतून प्रवास करू शकतील. यासाथी एमएमएमआरडीए लवकरच एक कंत्राट काढणार आहे. पंतप्रधान नरेंदे मोदींनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी दोन्ही मार्गांचे भूमीपुजन केले होते. २०१९ पासून या मार्गावरील वाहतूक सुरू होणार होती. परंतु कोरोना संकट, लॉकडाऊन मुळे हे काम खोळंबले होते. आता लवकरच ही मेट्रो सुद्धा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
अधिक वाचा : गर्दी कमी करण्यासाठी येरवडा कारागृहातून महिनाभरात ४१८ कैद्यांची सुटका
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.