Aarey Metro Car Shed: मुंबईतील मेट्रोचं कारशेड (Mumbai Metro Carshed) आरेमध्ये होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी कांजूरमार्ग येथील कारशेड हे आरेमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच आरेमध्ये मेट्रो कारशेडमध्ये असलेली स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उठवली होती. त्यानंतर आता शिंदे सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील कारशेडच्या संदर्भातील वाद आता संपलेला आहे. राज्यातील राजकीय समिकरण आणि सत्तांतर बदलताच आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठाकरे सरकारने 1 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आदेश काढत 102 एकरचा कांजूरमार्गचा भूखंड एमएमआरडीएला देण्याचा आदेश काढला. याच जागेवर आरेमधील कारशेड कांजूरला हलवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर या निर्णयाला केंद्र सरकारने मिठागर आयुक्तालयामार्फत आव्हान देत कांजूरमार्ग येथील जागेवर आपला मालकी हक्क दाखल केलेला. या दोन्ही याचिका विचारत घेता 16 डिसेंबर 2020 रोजी मुंबई हायकोर्टाने तेथील कामाला पूर्णपणे स्थगिती दिली होती. पण राज्यात पुन्हा सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस गटाने पुन्हा कांजूरमार्ग येथील कारशेड आरे येथे हलवण्याचा निर्णय घेतला.
हे पण वाचा : भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? रात्री भटकतात आत्मा?
29 ऑगस्ट 2022 रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी घेतलेला आदेश मागे घेत असल्याचं सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवरचा वाद आता मिटला आहे. त्यासोबतच आता मेट्रोचं हे कारशेड आता कांजूरमार्ग येथीलच होईल हे आता स्पष्ट झालं आहे.
मुंबईतील मेट्रोच्या कामात अनेक अडचणी येत होत्या. तसेच जोपर्यंत मेट्रोचं कारशेड पूर्ण होत नाही तोपर्यंत मेट्रो या कामात अडचणी येतच राहणार होत्या. पण आता मेट्रोचं कारशेड हे आरेमध्येच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळेल.
हे पण वाचा : Mumbai Local Train: धावत्या लोकलसमोर अचानक आली एक महिला आणि मग...., मुंबईतील Shocking VIDEO
मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार करणारा मुंबई मेट्रो मार्ग-3 म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर आज मेट्रो चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली.
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे, असा विश्वास यासमयी व्यक्त केला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले. pic.twitter.com/SCP0hJf1AV — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 30, 2022
या मेट्रो मार्ग-3 वर एकूण 27 भुयारी स्थानके आणि 1 स्थानक जमिनीवर असणार असून या मेट्रो मार्गावरून सुमारे 17 लाख प्रवासी प्रवास करतील तर या मार्गावरील 35 टक्के रस्त्यावरील गाड्या कमी होतील व त्यामुळे मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.