Mumbai Metro Line 2A and 7 Ticket prices: मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गांचे लोकार्पण, जाणून घ्या किती असेल तिकीट दर

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 19, 2023 | 12:30 IST

Mumbai Metro Rail Lines 2A and 7: मुंबई मेट्रोच्या दोन (मेट्रो 2 अ - दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर), (मेट्रो 7 - दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकांचे तिकीट दर नेमके किती असतील जाणून घ्या...

Mumbai Metro Rail lines 2a and 7 ticket prices route details in marathi
Mumbai Metro Line 2A and 7 Ticket prices: मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गांचे लोकार्पण, जाणून घ्या किती असेल तिकीट दर 
थोडं पण कामाचं
 • 12600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2अ आणि 7 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
 • दहिसर पूर्व आणि डीएन नगर (पिवळी लाईन) यांना जोडणारी मेट्रो 2 अ ही मार्गिका 18.6 किमी लांबीची
 • अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व (लाल लाईन) यांना जोडणारी मेट्रो 7 मार्गिका सुमारे 16.5 किमी लांबीची आहे

Mumbai metro 2a and 7 ticket fare, route, cost details in marathi: मुंबईतील मेट्रो मार्ग 7 (टप्पा 2) आणि मार्ग 2 अ (टप्पा 2) चे लोकार्पण 19 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. 12600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण झाल्याने याचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (पिवळी लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2 अ ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे. तर अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व (लाल लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. जाणून घ्या या दोन्ही मेट्रो लाईन्सच्या रूट बाबत आणि तिकीट दराबाबत अधिक माहिती... (Mumbai Metro Rail lines 2a and 7 ticket prices route details in marathi)

Mumbai Metro 7 details

मुंबई मेट्रो मार्ग 7 गुंदवली (अंधेरीपूर्व) ते दहिसर पूर्व कॉरिडॉर ही पश्चिम द्रुतगती मार्गालगत असून मुंबई मेट्रो मार्ग 7 मुळे मुंबईच्या पश्चिमेकडील भागांना पूर्वेकडील भागांशी जोडून सेवा देईल. मुंबई मेट्रो मार्ग 7 मुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-7 टप्पा-1 आणि टप्पा 2 या दोन टप्प्यात पूर्ण केली आहे.

हे पण वाचा : दालचिनीचं पाणी प्या अन् चमत्कार पहा

Metro 7 (Phase 1) stations and distance

मुंबई मेट्रो मार्ग 7  - एकूण लांबी 16.5 किमी, एकूण स्थानके 13 (उन्नत). मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-1 ) हा 10.902 किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे ज्यामध्ये 9 स्थानके आहेत (आरे ते दहिसर (पू)) ज्यामधे (दहिसर (पू) हे स्थानक मुंबई मेट्रो मार्ग 2अ अंतर्गत येते.

हे पण वाचा : व्हाईट ब्रेड ठरू शकतो घातक, जास्त खाल्ल्यास आरोग्य धोक्यात

मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-1) Mumbai Metro 7 route (Phase 1) stations

 1. ओवरीपाडा 
 2. राष्ट्रीय उद्यान 
 3. देवीपाडा 
 4. मागाठाणे 
 5. पोईसर 
 6. आकुर्ली 
 7. कुरार 
 8. दिंडोशी 
 9. आरे या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

हे पण वाचा : Chanakya Niti: अशा महिला पतीसाठी असतात भाग्यशाली

Metro 7 (Phase 2) stations and distance

(गुंदवली ते आरे) मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-2) 5.552 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे ज्यामध्ये 4 स्थानके आहेत. 

 1. गोरेगाव पूर्व 
 2. जोगेश्वरी पूर्व 
 3. मोगरा 
 4. गुंदवली या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

हे पण वाचा : कांदा चिरण्यासाठी वापरा आयडिया ढासू, येणार नाही डोळ्यात आसू

Metro 2A (Phase 1) stations and distance

मुंबई मेट्रो मार्ग 2अ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2अ सुद्धा टप्पा-1 आणि टप्पा-1 या दोन पूर्ण केली आहे.

मुंबई मेट्रो मार्ग 2अ (टप्पा-1) हा 9.828 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये 9 स्थानके आहेत (डहाणुकरवाडी ते दहिसर पूर्व).

मुंबई मेट्रो मार्ग 2 अ (टप्पा-1) मधील स्थानके Metro 2A Stations

 1. दहिसर पूर्व 
 2. आनंद नगर 
 3. कांदरपाडा 
 4. मंडपेश्वर 
 5. एकसर 
 6. बोरिवली प. 
 7. पहाडी एकसर 
 8. कांदिवली प. 
 9. डहाणुकरवाडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

हे पण वाचा : जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याचे फायदे

Mumbai Metro 2a and 7 ticket prices

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ या दोन्ही मार्गिकांच्या तिकीट दरांची घोषणा केली आहे. या मार्गिकांसाठी तिकीट दर 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत असणार आहे. तिकीट दर हे स्थानकांमधील अंतरावर आधारित आहेत. 

 1. 0 ते 3 किमी अंतरासाठी 10 रुपये 
 2. 3 ते 12 किमी अंतरासाठी 20 रुपये
 3. 12 ते 18 किमी अंतरासाठी 30 रुपये 
 4. 18 ते 24 किमी अंतरासाठी 40 रुपये 
 5. 24 ते 30 किमी अंतरासाठी 50 रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी