MHADA LOTTERY: म्हाडाच्या एका घरासाठी 4 दावेदार, 4640 घरांसाठी 18905 अर्ज, 10 एप्रिलपर्यंत होणार रजिस्ट्रेशन!

मुंबई
Updated Apr 02, 2023 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mhada Lottery 2023 : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी, म्हाडाच्या कोकण मंडळाने ४६४० फ्लॅटची लॉटरी जाहीर केली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मुंबईकर घरासाठी खूप उत्सुक असून, प्रत्येकी एका घरासाठी अनुक्रमे चार अर्ज आले आहेत. 

मुंबईकरांचा म्हाडाच्या 4640 घरांसाठी चौपट प्रतिसाद
Mhada Lottery 2023  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • म्हाडाच्या एका घरासाठी चार अर्ज
  • म्हाडा कोकण बोर्डाच्या सदनिका लोकांच्या पसंतीस 
  • 4640 घरांसाठी लॉटरी जाहीर

मुंबई :  ठाणे, कल्याण, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये तयार स्थितीत असलेल्या म्हाडा कोकण बोर्डाच्या घरांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉटरीत समाविष्ट घरांच्या तुलनेमध्ये म्हाडाकडे चौपट अर्ज आले आहेत, शिवाय या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज प्रकियेला अजून 9 दिवस बाकी आहे, त्यामुळे या नऊ दिवसांत आणखीन जास्त अर्ज येण्याची मोठी शक्यता आहे. (Mumbai Mhada Lottery Four Persons Have Registered For One flate )

अधिक वाचा : ​लखनऊ नवाबांसमोर ढेफाळली दिल्लीची फलंदाजी; 50 धावांनी पराभव

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 18905 लोकांनी 4640 घरांसाठी नोंदणी केली आहे. तर 10,430 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा करून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.  सदर प्रक्रियेदरम्यान अर्जदारांनी एजंटपासून सावध राहण्याचे आवाहन म्हाडा बोर्डकडून करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉटरीसाठी म्हाडाकडून कोणत्याही एजंटची नियुक्ती करण्यात आलेली नाही. लॉटरीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जात आहे.

अर्जदारांना म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवरून लॉटरीत समाविष्ट घरांची माहिती मिळू शकते. त्याच वेळी अर्जदार IHLMS 2.0 (इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टम) एपद्वारे लॉटरी नोंदणी आणि पैसे जमा करण्याची प्रक्रियादेखील पार पाडू शकतात. ही नोंदणी प्रक्रिया अधिक सहज करण्यासाठी वेबसाइटवर काही मार्गदर्शक व्हिडिओदेखील अपलोड करण्यात आलेले आहेत. 

अधिक वाचा : Viral Video : दोन मुलींसोबत तरुणाचा बाईकवर जीवघेणा स्टंट

म्हाडाच्या कोकण बोर्डाची लॉटरी 10 मे रोजी ठाणे येथे जाहीर केली जाणार आहे.  4640 घरांना आपल्या नावे करण्याच्या या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी 10 एप्रिल रात्री 11 वाजून 59 मिनिटे पर्यंत अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदार 12 एप्रिलला रात्री 11 वाजून 59 मिनिटे पर्यंत आरटीजीएस किंवा एनईएफटीच्या माध्यमातून अनामत रक्कम भरून आपली दावेदारी पक्की करू शकतात. म्हाडाच्या आवेदपत्रानुसार, 10 एप्रिलच्या रात्रीपासून ऑनलाइन नोंदणीची लिंक बंद होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्जदारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण केली जाईल. ४ मे रोजी म्हाडाकडून पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे.  

आतापर्यंत आलेले अर्ज - 18,905
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल
अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख - 12 एप्रिल
पात्रता यादी - 4 मे
लॉटरी - 10 मे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी