Mumbai Gang rape: अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी केला गँगरेप, सामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली

Minor girl gang raped in Mumbai: एका अल्पवयीन मुलीवर कथितपणे सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
  • पीडित मुलीच्या वर्गातील दोन मुलांनी केलं घृणास्पद कृत्य
  • मुंबईतील घटनेने खळबळ

Mumbai Crime News: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका शाळेतील आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी कथितपणे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. (Mumbai minor girl allegedly gang rape by school students crime news marathi)

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी दोन्ही मुले अल्पवयीन आहेत. ही घटना सोमवारी घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?

माटुंगा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वर्गातील इतर मुले डान्स प्रॅक्टिससाठी बाहेर गेले त्यावेळी दोन विद्यार्थ्यांनी या पीडित मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी आणि आरोपी हे सर्वजण आठवीचे विद्यार्थी आहेत.

हे पण वाचा : डिसेंबर महिन्यात 6 ग्रहांचे गोचर, या राशीच्या व्यक्तींवर होणार धनवर्षाव

या घटनेने पीडित मुलीला मोठा धक्का बसला आहे. पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हे पण वाचा : त अक्षरावरुन मुला-मुलींची लेटेस्ट नावे, जाणून घ्या अर्थासह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मुलांच्या विरोधात आयपीसी 376 डीए आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि त्यामुळे त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी