आईची हत्या करुन मुलाची आत्महत्या, मुंबईत घडली ही धक्कादायक घटना

मुंबई
Updated Jun 25, 2019 | 18:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai crime: मुंबईतील मीरा रोड येथे एका फ्लॅटमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. तेथे त्यांच्या लॅपटॉपमध्ये सुसाईड नोट देखील सापडली आहे.

mother_son_found_dead_in_his_flat_Ani
मुंबई: आईची हत्या करुन मुलाची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: मुंबईच्या मीरारोड येथे एक वृद्ध महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आज (मंगळवार) पोलिसांनी एका घरातून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या घरातील एका लॅपटॉपवर सुसाइड नोट देखील मिळाली आहे. या सुसाइड नोटमधून असं समजतं आहे की, या मुलानेच आपल्या आईची हत्या करून नंतर आत्महत्या केली. पण यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मृत महिलेचं नाव मीनाक्षी अय्यर (वय ७५ वर्ष) आहे. तर तिच्या मुलाचं नाव व्यंकटेश्वरम अय्यर (वय ४२ वर्ष) असल्याचं समजतं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मुलाने आधी आईची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर स्वत:लाही संपवलं. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. शेजाऱ्यांना अय्यर यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आई आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलीस अधिकारी शेखर डोंबे यांनी याबाबतची माहिती दिली. 

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले त्यावेळी अय्यर यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होत्या. त्यामुळे पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. त्यानंतर मीनाक्षी अय्यर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तर त्यांचा मुलगा व्यंकटेश्वरम याचा मृतदेहावर कोणत्याही खुणा नव्हत्या. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यामुळे त्याच्या अहवालानंतरच दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे. दरम्यान, यावेळी त्यांच्या बिल्डिंगमधील लोकांनी अशीही माहिती दिली की, मागील चार दिवसांपासून मुलगा आणि आई हे घराच्या बाहेर दिसले नव्हते. 

व्यंकटेश्वरम अय्यर हा आपल्या आईसोबत २०१७ मध्ये मुंबईत आला होता. तो मीरा रोड येथील मॅरीगोल्ड अपार्टमेंटमध्ये राहत होता. ते ज्या घरात राहत होते तेथील भाडे करार हा एप्रिल महिन्यातच संपला होता. पण यावेळी अय्यर कुटुंबाने घरमालकाकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. त्यावेळी त्यांनी घरमालकाला असं सांगितलं होतं की, आमचं काही महत्त्वाचं काम असल्याने आम्हाला काही दिवस याच ठिकाणी राहू दे. त्यामुळे घरमालकाने त्यांची ही विनंती मान्य केली होती. पण आज अचानक दोघांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासही सुरु केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आईची हत्या करुन मुलाची आत्महत्या, मुंबईत घडली ही धक्कादायक घटना Description: Mumbai crime: मुंबईतील मीरा रोड येथे एका फ्लॅटमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. तेथे त्यांच्या लॅपटॉपमध्ये सुसाईड नोट देखील सापडली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली? त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली? त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhansabha Election: हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; पाहा राज्यभरात किती टक्के मतदान
Vidhansabha Election: हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; पाहा राज्यभरात किती टक्के मतदान
[VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं'
[VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं'
'या' गावातील एकाच मतदाराने केले मतदान, का झालं असं जाणून घ्या... 
'या' गावातील एकाच मतदाराने केले मतदान, का झालं असं जाणून घ्या... 
टाइम्स नाऊ मराठी एक्झिट पोल : कोण जिंकणार कोण होणार पराभूत
टाइम्स नाऊ मराठी एक्झिट पोल : कोण जिंकणार कोण होणार पराभूत
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा धिक्कार, त्यांनी किमान नात्याची जाण ठेवायला हवी होती: मुख्यमंत्री 
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा धिक्कार, त्यांनी किमान नात्याची जाण ठेवायला हवी होती: मुख्यमंत्री 
टाइम्स नाऊ मराठीचा एक्झिट पोल, पाहा कोणाची येणार सत्ता
टाइम्स नाऊ मराठीचा एक्झिट पोल, पाहा कोणाची येणार सत्ता
Maharashtra Election 2019: ते 200 च्या पार जाणार नाही, मनोहर जोशींचा महायुतीला घरचा आहेर 
Maharashtra Election 2019: ते 200 च्या पार जाणार नाही, मनोहर जोशींचा महायुतीला घरचा आहेर