new tabs to 10th standard students : मुंबई महापालिका दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार नवे टॅब

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 02, 2022 | 17:26 IST

Mumbai Municipal Corporation will give new tabs to 10th standard students : मुंबई महापालिका मनपा शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नवे टॅब देणार आहे. ही योजना राबविण्यासाठी महापालिका १९ हजार ४०१ टॅब खरेदी करणार

Mumbai Municipal Corporation will give new tabs to 10th standard students
मुंबई महापालिका दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार नवे टॅब 
थोडं पण कामाचं
  • मुंबई महापालिका दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार नवे टॅब
  • महापालिका १९ हजार ४०१ टॅब खरेदी करणार
  • प्रत्येक टॅबसाठी महापालिका १७ हजार ४०० रुपये मोजणार

Mumbai Municipal Corporation will give new tabs to 10th standard students : मुंबई : मुंबई महापालिका मनपा शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नवे टॅब देणार आहे. ही योजना राबविण्यासाठी महापालिका १९ हजार ४०१ टॅब खरेदी करणार आहे. प्रत्येक टॅबसाठी महापालिका १७ हजार ४०० रुपये मोजणार आहे. टॅब खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपयांचा एकूण खर्च केला जाईल.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना नवे टॅब दिले जातील. पालिकेच्या शाळांतील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना नवे टॅब दिले जाणार आहेत. 

कोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. नव्या टॅबमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे सोपे होईल; असे महापालिकेच्या प्रशासनाने सांगितले. इडुसपार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टॅब खरेदी करत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. महापालिकेने आधी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ४४ हजार टॅबची खरेदी केली आहे. आणखी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण करुन हे टॅब २०२२-२३ मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. 

नव्या टॅबची वैशिष्ट्ये - 

  1. कंपनी एक वर्षाची गॅरेंटी देणार
  2. प्रत्येक टॅबसाठी महापालिका जास्त पैसे देणार म्हणून आणखी कंपनी आणखी चार वर्षांची गॅरेंटी देणार
  3. प्रत्येक टॅबमध्ये वर्षभराचा अभ्यासक्रम
  4. १९ हजार ४०१ टॅबच्या खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपये खर्च केला जाणार
  5. एका टॅबची मूळ किंमत ११ हजार रुपये आणि अतिरिक्त गॅरेंटी तसेच अभ्यासक्रम अपलोड करण्याचे म्हणून प्रत्येक टॅबचे आणखी ६ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण १७ हजार ४०० रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी