Santacruz Murder Case :  प्रियकरासाठी पत्नीने पती आणि सासूला जेवणातून थोडं-थोडं विष देत मारलं

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 11, 2023 | 09:35 IST

Mumbai Murder Case, Mumbai Crime News, wife killed her husband and mother in law by giving poison from the food : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथे एक धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी काजल उर्फ कविता शहा आणि हितेश जैन यांच्याविरोधात कोर्टात 1350 पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले.

Santacruz Murder Case
मुंबईत प्रियकरासाठी पत्नीने केली हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पत्नीने पती आणि सासूला जेवणातून थोडं-थोडं विष देत मारलं
  • प्रियकरासाठी पत्नीने केली हत्या
  • पोलिसांनी हत्या करणाऱ्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला केली अटक

Mumbai Murder Case, Mumbai Crime News, wife killed her husband and mother in law by giving poison from the food : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथे एक धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी काजल उर्फ कविता शहा आणि हितेश जैन यांच्याविरोधात कोर्टात 1350 पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. पती कमलकांत शहा आणि सासू सरला शहा यांना थॅलियम आणि आर्सेनिक या दोन विषांची थोडी थोडी मात्रा देऊन पद्धतशीरपणे संपवण्यात आले, असा आरोप पोलिसांनी काजल उर्फ कविता शहा आणि हितेश जैन या दोघांवर केला आहे. 

लग्न झालेल्या काजल उर्फ कविता शहा या हितेश जैन यांच्या प्रेमात होत्या. संपत्ती हडपण्यासाठी काजल उर्फ कविता शहा आणि हितेश जैन या दोघांनी मिळून कमलकांत शहा आणि त्यांची आई सरला शहा यांना विष देऊन पद्धतशीरपणे ठार केले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

सरला शहा यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 2022 रोजी झाला. नंतर 19 सप्टेंबर 2022 रोजी कमलकांत शहा यांचा मृत्यू झाला. मृत्यूआधी दोघांचे अवय निकामी झाले होते. दोघांनीही ऑगस्ट 2022 मध्ये उलट्या आणि पोटात जळजळ होत असल्याची तक्रार केली होती. पण वयोमानामुळे नातलगांना सरला शहा यांचा मृत्यू नैसर्गिक वाटला होता. 

कमलकांत शहा यांनी तब्येत बरी नसताना एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट केली होती. या टेस्टचे रिपोर्ट शहा कुटुंबाच्या नातलगांनी बघितले. रिपोर्टनुसार कमलकांत शहा यांच्या रक्तात थॅलियम आणि आर्सेनिक या दोन विषांचे घटक आढळले होते. हा रिपोर्ट बघूनच शहा यांच्या नातलगांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीआधारे तपास करून पोलिसांनी हत्येचा कट रचणे, हत्या करणे अशा स्वरुपाचे आरोप ठेवून काजल उर्फ कविता शहा आणि हितेश जैन या दोघांना अटक केली. सध्या हे प्रकरण मुंबईच्या सेशन्स कोर्टात अर्थात सत्र न्यायालयात आहे. कोर्टाने आरोपी काजल उर्फ कविता शहा आणि हितेश जैन या दोघांना १३ एप्रिलपर्यंत सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीवेळी पोलिसांनी सर्व कागदपत्रे, जप्त केलेल्या वस्तू आणि पुरावे सादर करावे असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. 

कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS

मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर

कोण होते कमलकांत शहा?

कमलकांत शहा हे व्यावसायिक होते. ते मुंबईत सांताक्रुझ येथे वास्तव्यास होते. सांताक्रुझच्या घरात व्यावसायिक कमलकांत शहा, त्यांची पत्नी काजल उर्फ कविता शहा आणि आई सरला शहा हे तीनजण राहात होते. सरला शहा यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 2022 रोजी झाला. नंतर 19 सप्टेंबर 2022 रोजी कमलकांत शहा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तपास झाल्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जाणून घ्या ज्योतिबांचे प्रगल्भ विचार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी