Drug Case मध्ये भारती सिंह आणि हर्ष विरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 29, 2022 | 16:06 IST

Mumbai NCB files a 200-page chargesheet against comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiya : अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचिया या दोघांविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) 200 पानी आरोपपत्र दाखल केले.

Mumbai NCB files a 200-page chargesheet against comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiya
Drug Case मध्ये भारती सिंह आणि हर्ष विरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Drug Case मध्ये भारती सिंह आणि हर्ष विरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल
  • एनसीबीने भारती-हर्षच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला
  • एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 बी (ii) (ए) आणि 8 (सी) आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल केला

Mumbai NCB files a 200-page chargesheet against comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiya : अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचिया या दोघांविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) 200 पानी आरोपपत्र दाखल केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरू असताना बॉलिवूड आणि अंमली पदार्थ (ड्रग्स) हे नेटवर्क प्रकाशात आले. या प्रकरणात तपास सुरू असताना एनसीबीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर 21 नोव्हेंबर 2020 रोजी धाड टाकली. या धाडीत एनसीबीने भारती-हर्षच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला. यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 बी (ii) (ए) आणि 8 (सी) आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

सलमान खानने घेतली अंकित गुप्ताची शाळा

Yashoda Hindi Trailer: समंथाच्या सस्पेन्स-थ्रीलर 'यशोदा' सिनेमाचा Trailer out, अभिनेत्रीचा अ‍ॅक्शन लूक

घरात गांजा आढळल्यामुळे भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघांनाही न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. नंतर त्यांना 4 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. पण 23 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर भारती आणि हर्ष या दोघांना जामीन दिला होता. 

यानंतर एनसीबीने सत्र न्यायालयासमोर याचिका केली होती. फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर केला, असे एनसीबीचे म्हणणे होते. पण न्यायालयाने आरोपी तपासात सहकार्य करत असल्यामुळे जामीन कायम ठेवला होता. या पार्श्वभूमीवर आता भारती सिंह आणि हर्ष विरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल झाले आहे. पुढील न्यायालयीन कारवाई सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी