NCB Raid in Nanded and Jalgaon : एनसीबीच्या पथकाने नांदेडमध्ये पकडला 1.1 टन गांजा, एरंडोलमधून केला १५०० किलो गांजा जप्त

Ganja sized in maharashtra । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई पथकाने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून 1.1 टन गांजा पकडला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 4 कोटी आहे.

mumbai ncb seized 1500 kg ganja from jalgaon and cannabis worth of 4 crore in 35 bags seized in nanded in maharashtra
नांदेडमध्ये १.१ टन तर एरंडोलमध्ये १५०० किलो गांजा जप्त  
थोडं पण कामाचं
  • गांजाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होती. पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याची ओळख पटवली जात आहे.
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई पथकाने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून 1.1 टन गांजा पकडला आहे.
  • तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (erandol)येथे ही कारवाई करण्यात आली.

marijuana cought in  Nanded and Jalgaon । नांदेड :  गांजाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होती. पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याची ओळख पटवली जात आहे. 2 जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. (mumbai ncb seized 1500 kg ganja from jalgaon and cannabis worth of 4 crore in 35 bags seized in nanded in maharashtra)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई पथकाने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून 1.1 टन गांजा पकडला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 4 कोटी आहे. गांजाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होती. पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याची ओळख पटवली जात आहे. 2 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मौजे मांजरमजवळ त्याची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले. 


नांदेडमध्ये असा 1.1 टन गांजा पकडला

नायगाव तालुक्यातील मौजे मांजरमजवळ (ब्लॉक) गांजाची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई एनसीबी पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई एनसीबीचे पथक पहाटे पाचच्या सुमारास मांजरमला पोहोचले. येथे स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने एमएच 26 एडी 2165 क्रमांकाचा ट्रक अडविण्यात आला. ट्रकची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान 35 पोत्यांमध्ये 4 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

एरंडोलमधून १५०० किलो गांजा जप्त 

राज्यात चर्चेत असलेले ड्रग्ज प्रकरणाचे लोण आता जळगाव (jalgaon)जिल्ह्यातही पोहचले आहे. ड्रग्जचा मोठा व्यवहार झाला असून तो जळगाव येथे असल्याची टीप मिळाल्यानंतर एनसीबीचे (ncb) पथक थेट जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी केलेल्या कारवाईत थोडा थोडका नाही तर तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (erandol)येथे ही कारवाई करण्यात आली.

एनसीबीच्या (ncb)पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून ते आंध्र प्रदेशातील आहेत.

आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी