SBI Dahisar : मुंबईत स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा, गोळीबारात कंत्राटी कर्मचारी ठार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 30, 2021 | 00:35 IST

Mumbai: One killed in firing at Dahisar SBI branch : मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये स्टेट बँकेच्या शाखेवर दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेत काम करणाऱ्या एक कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

Mumbai: One killed in firing at Dahisar SBI branch
मुंबईत स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा, गोळीबारात कंत्राटी कर्मचारी ठार  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मुंबईत स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा, गोळीबारात कंत्राटी कर्मचारी ठार
  • दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला
  • सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू

Mumbai: One killed in firing at Dahisar SBI branch : मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये स्टेट बँकेच्या शाखेवर दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेत काम करणाऱ्या एक कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

दहिसरच्या एमएचबी कॉलनी परिसरातील एस व्ही रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवार २९ डिसेंबर २०२१ रोजी दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यावर गोळीबार करून अडीच लाख रुपयांची रोकड लुटून पळ काढला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

दरोडेखोरांनी कॅशियरला पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यावेळी बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या संदेश गोमारे यांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. हे पाहून दरोडेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात संदेश गोमारे (२५) यांचा मृत्यू झाला. तसेच एक कर्मचारी जखमी झाला. हे पाहून बँकेत असलेले सर्वजण घाबरले. कॅशियरकडे असलेली अडीच लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले. 

दरोडा प्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात छातीत जवळून गोळी लागल्यामुळे संदेश गोमारे यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या अन्य एका कर्मचाऱ्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दरोडा प्रकरणी तपास सुरू केला आहे. बँकेची शाखा तसेच शाखेबाहेर रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजची तपासणी सुरू आहे. दरोडा पडला त्यावेळी बँकेत उपस्थित असलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत. दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला त्यावेळी मास्कने चेहरा झाकला होता; असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी