अजूनही त्या चिमुरड्याचा शोध सुरूच, दहा किमीपर्यंत ड्रेनेज लाइनची पाहणी

मुंबई
Updated Jul 12, 2019 | 11:48 IST

बुधवारी रात्री तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा उघड्या गटारात पडला. त्यानंतर अजूनही त्याचा शोध सुरू आहे. जवळपास १० किलीपर्यंतच्या ड्रेनेज लाइनची पाहणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही आहे.

3-year-old boy who fell in a gutter Update
त्या चिमुरड्याचा शोध सुरूच, १० किमीपर्यंत ड्रेनेजची पाहणी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • दिव्यांशचा अजूनही शोध सुरूच
  • १० किमीपर्यंतच्या ड्रेनेज लाइनची पाहणी
  • गेल्या पाच वर्षांत गटार, समुद्रात बुडून ३२८ जणांचा मृत्यू 

मुंबईः गोरेगाव येथील आंबेडकर चौकात असलेल्या उघड्या गटारात बुधवारी रात्री तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा पडला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या मुलाचा शोध घेण्यात आहे. अजूनही या मुलाचा शोध लागत नाही आहे. पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान या चिमुरड्याचा शोध घेत आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत हा शोध सुरू होता. तरीही रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. 

बुधवारपासून आज सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेज लाइनची जवळपास दहा किलोमीटरपर्यंची पाहणी केली. तसंच जेसीबीच्या साहाय्यानं ड्रेनेज लाइन फोडून सुद्धा दिव्यांशचा शोध घेतला जात आहे. गुरूवारी संध्याकाळी या परिसरात एनडीआरएफच्या पथकाला पाचारणं करण्यात आलं. ५० हून अधिक कर्मचारी दिव्यांशचा शोध घेत आहेत.

बुधवारी रात्री गोरेगावमधल्या आंबेडकर परिसरात तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा उघड्या असलेल्या गटारात पडला. दिव्यांश खेळता खेळता रस्त्यावर आला.  रस्त्यावर उघड्या असलेल्या नाल्यात तो पडला आणि वाहून गेला. त्यानंतर बराच वेळ दिव्यांशचा पत्ता न लागल्यानं त्याच्या आईनं त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यातच आधी पासून मुसळधार पाऊस पडतो होता. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यानंतर जवळ असलेल्या मशिदीतल्या सीसीटीव्ही फुटेज आधार घेतला. फुटेज तपासल्यानंतर तो गटारात पडल्याचं दिसलं. 

इटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकातील चाळीमध्ये दिव्यांश आपल्या कुटुंबासोबत राहतो. आई वडील आणि दोन भावंडं असा त्याचा परिवार आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दिव्यांश खेळत होता. वडील काही कामासाठी घराच्या बाहेर पडले. वडिलांना बाहेर पडताना बघताच तो सुद्धा त्यांच्या मागोमाग गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाही म्हणून तो पुन्हा मागे फिरत होता. तेव्हा तिथे असलेल्या उघड्या गटारात पडला.  त्यानंतर तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आलं. आजूबाजूला असलेल्या गटारावरील प्लॅस्टर तोडण्यात आलं. या भागात गटारापासून जवळच दोन मोठे नाले आहे. 

स्थानिकांचा रास्तारोको 

महापौर घटनास्थळावर दाखल होण्याआधी आंबेडकर नगरमध्ये रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. दिव्यांश वाहून जाण्याच्या या घटनेला केवळ मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गुरूवारी सकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून एस.व्ही. रोडकडे जाणऱ्या मार्गावर हा रास्तारोका करण्यात आला. 

उघड्या गटारांसाठी मुंबईकर जबाबदारः महापौर

या दुर्देवी घटनेनंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर महापौरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत मुंबईकरांनाच जबाबदार धरलं आहे.  महाडेश्वर यांनी तीन वर्षांचा चिमुरडा नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडल्याचं खापर मुंबईकरांवर फोडलं. मुंबईत अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरचं झाकणं काढत असतात, असा अजब दावा केला आहे.

महापौरांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलं की, दिव्यांशच्या आईनं त्याची काळजी घ्यायला हवी होती. तसंच गटारावरचं झाकण उघडं का होतं? स्थानिकांनी झाकणं तोडलं होतं का? प्रशासनानेच गटारावर झाकण बसवलं नव्हतं का? याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

धक्कादायक ! गटार, समुद्रात बुडून ३२८ जणांचा मृत्यू 

मुंबईत गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०१३ ते २०१८ या कालावधीत मॅनहोल आणि समुद्रात बुडण्याच्या ६३९ दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनांमध्ये ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती मुंबई महापालिकेनं माहितीच्या अधिकाराअंतर्गत दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पाच वर्षांत गटारे, मॅनहोल आणि समुद्रात बुडून किती दुर्घटना झाला आहेत याबाबतची माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाकडून मागवली होती. त्यावर पालिकेनं दिलेल्या उत्तरात नाले, नद्या, विहीरी, खाडी, समुद्र, खदानी, मॅनहोल, उघडी गटार यामध्ये पडून ३२८ जणांचा मृत्यू झाल्यानं माहिती दिली आहे. 

दुर्घटना मृत्यू वर्ष 
     
८०  ३७ २०१३
१०३ ६४ २०१४
८५ ४५ २०१५
१२९ ६२ २०१६
१५४ ७८ २०१७
८८ ४२ २०१८ जुलैपर्यंत 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अजूनही त्या चिमुरड्याचा शोध सुरूच, दहा किमीपर्यंत ड्रेनेज लाइनची पाहणी Description: बुधवारी रात्री तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा उघड्या गटारात पडला. त्यानंतर अजूनही त्याचा शोध सुरू आहे. जवळपास १० किलीपर्यंतच्या ड्रेनेज लाइनची पाहणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही आहे.
Loading...
Loading...
Loading...