ED summons to Sanjay Raut wife: शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडीच्या रडारवर आहेत. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावरुन पैशांची देवाणघेवाण करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून आज दुसऱ्यांदा त्यांना ईडीची कोठडी सुनावली आहे. संजय राऊत हे अटकेत असतानाच आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. (Mumbai Patra Chawl case ed summons varsha raut after the arrest of Sanjay raut on money laundering)
#RautChawlGate: #SanjayRaut's wife, Varsha Raut summoned by ED. — TIMES NOW (@TimesNow) August 4, 2022
Trouble mounting for Rauts?
"This is political vendetta", says Arvind Sawant, Shiv Sena@Shivani703 shares the latest details. pic.twitter.com/nUCTrMRQ95
वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात आलेले पैसे हे संजय राऊत यांच्यासाठी आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या व्यवहाराच्या संदर्भातच अधिक माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले असल्याची माहिती समोर येत आहे.
ईडीने अटक केलेल्या संजय राऊत यांना आज कोर्टात हजर केले. यावेळी कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीने आरोप केला की, संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नसून आर्थिक व्यवहारांबाबत ते माहिती देत नाहीयेत. त्यामुळे ज्यांच्यासोबत व्यवहार झाला आहे त्यांना चौकशीसाठी बोलावू असं ईडीने कोर्टात म्हटलं. त्यानंतर आता वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.
अधिक वाचा : राऊतांनी मागितला पंखा, ईडीने दिला एसी; वाचा कोर्टातील युक्तिवादाची कहाणी
पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट. म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.
पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.
एकूण १०३९.७९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले. प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे हस्तांतरित केली. ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिल्याचं समोर आलं.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.