Drugs factory busted: १ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मुंबईतील अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 16, 2022 | 18:40 IST

1026 crore drugs seized: मुंबईतील अंमली पदार्थविरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ हजारांहून अधिक किमतीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. 

Mumbai Police Anti Narcotics cell busted drug racket and seized 1026 crores md drugs
Drugs factory busted: १ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मुंबईतील अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई
  • ५१३ किलो वजनाचं एमडी ड्र्ज जप्त
  • जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल १ हजार २६ कोटी रुपये 

Mumbai team seized 1000 crore drug: मुंबईतील अंमली पदार्थविरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. गुजरातमधील ड्रग्जच्या फॅक्ट्रीवर छापा टाकून तब्बल ५१३ किलोंचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १०२६ कोटी रुपये इतकी आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाची ही एक मोठी करावाई मानली जात आहे. (Mumbai Police Anti Narcotics cell busted a drug racket and seized 1026 crores md drugs)

गुजरातमधून समुद्रमार्गे अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्याच दरम्यान आता वडोदरा येथून एमडी ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या फॅक्ट्रीचा भांडाफोड करण्यात आला आहे. वडोदरा जिल्ह्यातील मोक्षी गावात ही फॅक्ट्री होती. या फॅक्ट्रीवर छापा टाकत १०२६ कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. वडोदरा येथील सावली तहसीलजवळ ड्रग्जचा मोठा साठा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ज्या फॅक्ट्रीवर छापा टाकण्यात आला त्याठिकाणी औषधांचा साठा सापडला नाही तर केमिकलच्या निर्मितीच्या नावाखाली तेथे एमडी ड्र्ग्ज तयार करत असल्याचं समोर आलं.

अधिक वाचा : Ajit Pawar: 'सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?', अजित पवार प्रचंड संतापले

या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

जप्त करण्यात आलेला हा एमडी ड्रग्जचा साठा मुंबई आणि गोव्याला होणार होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई आणि गोव्यातून हे ड्रग्ज देशभरातील इतर ठिकाणी पाठवले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहे याचा तपास आता पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी