Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणार्‍या रेणू शर्माला अटक, बलात्काराची खोट्या तक्रारीची दिली होती धमकी

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणार्‍या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिला दुसरी तिसरी कोणी नसून धनंजय मुंडे यांच्या दुसरी पत्नी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे. रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

renu sharma
मंत्री धनंजय मुंडे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणार्‍या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
  • महिला दुसरी तिसरी कोणी नसून धनंजय मुंडे यांच्या दुसरी पत्नी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे.
  • रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणार्‍या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिला दुसरी तिसरी कोणी नसून धनंजय मुंडे यांच्या दुसरी पत्नी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे. रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास बलात्काराची खोटी तक्रार दाखल करू अशी धमकीही रेणू शर्माने दिली होती. अखेर ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रेणू शर्माल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  (Mumbai Police  arrests a woman  for allegedly trying to extort money from Maharashtra minister Dhananjay Munde)

रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्री क्रमांकावरून फोन करून धमकी दिली होती. रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गेल्या वर्षी एका कागदामुळे तुमचे मंत्रिपद धोक्यात आले होते आता पाच कोटी रुपये फार मोठी रक्कम नाही असे रेणू शर्माने धनंजय मुंडे यांना सांगितले. तसेच पैसे न दिल्यास बलात्काराची खोटी तक्रार दाखल करू अशी धमकीही दिली होती. धनंजय मुंडे यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये आणि १.४२ लाख्ह रुपयांचा फोन रेणू शर्माला पाठवला होता. तरी रेणू शर्माने ५ कोटी रुपयांचा तगादा लावलाच. 

अखेर धनंजय मुंडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी रेणू शर्माविरोधात मलबार हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी मध्य प्रदेशच्या इंदूरहून रेणू शर्माला अटक केली. इंदूरमध्ये कोर्टात रेणू शर्माला सादर केल्यानंतर तिल मुंबईत आणले आहे. 

रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांच्या दुसरी पत्नी करुणा शर्मा यांची बहीण आहे. फक्त धनंजय मुंडेच नव्हे तर राज्यातील काही नेत्यांनी रेणू शर्माने अशा प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे म्हटले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी