Gay Sex Racket : मुंबई : मुंबईत पोलिसांनी (mumbai police) गे सेक्स रॅकेट (gay sex racket) उध्वस्त केले आहे. हा पहिलाच गे सेक्स रॅकेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक (three arrested) केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी ऑनलाईन डेटिंग ऍप (online dating app) ‘ग्राईंडर’च्या माध्यमातून गे सेक्स रॅकेट चालवायचे. आरोपी युजर्सचे अश्लील व्हिडीओ (obscene video) बनवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. (mumbai police busted gay sex racket three arrested)
Maharashtra | We've arrested 3 ppl &busted a gang that was allegedly running a gay sex racket through an app. We've received a complaint from a person that 5 people thrashed him, took away cash, cards&posted an objectionable video of him on social media: Hasan Mulani, SI, Malwani pic.twitter.com/fUq7XNFGMa — ANI (@ANI) January 19, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युजर हे ऍप डाऊनलोड करायचे आणि आपली माहिती भरायचे. नंतर आरोपी एकाच भागातील तरुणांशी भेटायचे. नंतर ओळख आणि मैत्री वाढवून अनैतिक संबंध प्रस्थापित करायचे. एका तरुणाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
आरोपींनी एका तरुणाचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यासाठी आरोपींनी पैश्यांची मागणीही केली होती. काही तरुणांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांच्याकडून पैसे उकळले होते, काहींनी पैसे नकार दिल्याने आरोपींनी पीडित व्यक्तीला मारहाणही केली होती. अखेर एका पीडित तरुणाने कशीबशी त्यांच्याकडून सुटका केली आणि आपल्या नातेवाईकांना याबाबत सांगितले. अखेर पोलिसांनी याबाबत कारवाई करत तीन जणांना अटक केली. त्यानंतर हा संपूर्ण गेस सेक्स रॅकेट असल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटली असून इरफान फुरकान खान, अहमद फारूकी शेख व इमरान शफीक अशी त्यांची नावे आहेत.तिघांचे वय २४ ते २६ दरम्यान आहे. तसेच या प्रकरणी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहेत याचा शोध घेत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.