जबरदस्त! आता मुंबई पोलिसांचा ड्रोन करणार शत्रूला गारद

मुंबई
Updated Sep 23, 2019 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Police Drone detection system: बदलत्या तंत्रज्ञानानुसार पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणातही अनेक बदल होतायत. मुंबई पोलिसांनी नुकतंच एका ड्रोन डिटेक्टर मशीनची चाचणी घेतली जे हवेतच संशयास्पद ड्रोन निकामी करणारय

mumbai police drone detection system high alert coast guard
जबरदस्त! आता मुंबई पोलिसांचा ड्रोन करणार शत्रूला गारद 

थोडं पण कामाचं

  • मुंबई पोलिसांची जबरदस्त सुरक्षा
  • बदलत्या तंत्रज्ञानानुसार पोलिसांची हाय-टेक सुरक्षा
  • मुंबई पोलिसांनी घेतली ड्रोन डिटेक्टरची यशस्वी चाचणी
  • ड्रोन डिटेक्टरच्या माध्यमातून हवेतच संशयास्पद ड्रोनवर चढवणार हल्ला

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे दहशतवाद्यांच्या नेहमीच हिटलिस्टवर असतं आणि दहशतवाद्यांनी आतापर्यंत अनेकवेळा मुंबईत हल्ले घडवून आणले आहेत. आगामी काळात दहशतवाद्यांकडून टेक्नोलॉजीचा वापर करुन मुंबईत ड्रोन हल्ला करण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. दहशतवाद्यांचा हा कट लक्षात घेऊनच मुंबई पोलिसांनीही आपली हाट-टेक सुरक्षा यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे.

नुकतचं मुंबई पोलिसांनी एका ड्रोन डिटेक्टरची चाचणी घेतली. हे ड्रोन डिटेक्टर हवेतच संशयास्पद ड्रोन डिटेक्ट करुन निकामी करु शकतं. या ड्रोन डिटेक्टरची क्षमता खूपच चांगली असून त्याच्या माध्यमातून ८०० मीटर दूर असलेल्या ड्रोनला निकामी करता येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या उपस्थितीत ही ड्रोन डिटेक्शनची चाचणी घेण्यात आली. ड्रोन डिटेक्टर हवेतच संशयास्पद असलेल्या ड्रोनला हेरुन ते निकामी करेल आणि त्याचा मोठा फायदा मुंबई पोलिसांना होणार आहे.

मुंबईत ड्रोन उडवण्यावर, पॅराग्लायडिंग करण्यास बंदी आहे. मात्र, असं असतानाही ड्रोन हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळेच आता मुंबई पोलिसांनी हाय-टेक सुरक्षेचा वापर करत ड्रोन डिटेक्शन सीस्टमचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी नुकतंच या ड्रोन डिटेक्शनची चाचणी घेतली असून आता लवकरच हे ड्रोन डिटेक्टर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ड्रोन डिटेक्टर नेमकं काय करतं?

ड्रोन डिटेक्टर हे हवेत असलेल्या ड्रोनला पाहून त्याचं रेडिओ सिग्नल डिस्कनेट करतं. रेडिओ सिग्नल डिस्कनेट झाल्याने ते ड्रोन निकामी होईल. मुंबई पोलिसांनी चाचणी घेतलेल्या या ड्रोनची क्षमता ८०० मीटर दूरपर्यंत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...