Mumbai Police Guidelines for Holi 2023: होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

Holi 2023 Festival guidelines by Mumbai Police: आगामी होळी, रंगपंचमी सण साजरे करण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या काय आहेत मार्गदर्शक सूचना...

Mumbai police issue guidelines for holi dhulwad and rangpanchami festival you should know read details in marathi
Mumbai Police Guidelines for Holi: होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना, दुर्लक्ष करू नका अन्यथा...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • होळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
  • मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे

Holi 2023 Festival guidelines  by Mumbai Police: होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (Mumbai police issue guidelines for holi dhulwad and rangpanchami festival you should know about it)

होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 6 मार्च रोजी होळीचा सण आहे. 7 मार्च रोजी धूलिवंदन तर 12 मार्च रोजी रंगपंचमीचा सण आहे. या सणांसाठी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांसाठी खास नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे पण वाचा : ... म्हणून डोळ्यातून वारंवार येतं पाणी

Mumbai Police Guidelines for Holi:

  1. रंगपंचमी साजरी करताना रंगांनी भरलेले किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे इतरांवर फेकू नका.
  2. सण साजरा करताना कोणत्याही अश्लील भाषेचा, शब्द प्रयोगांचा उच्चार किंवा अश्लील गाणी बोलू नयेत.
  3. कोणाच्याही जाती, धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही काम किंवा घोषणा, घोषणा करू नका.
  4. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज वाढविण्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
  5. रात्री 10 वाजण्यापूर्वी होलिका दहन करणे आवश्यक आहे
  6. एखाद्याला बळजबरीने रंगवणे किंवा त्याच्यावर पाण्याने भरलेले फुगे फेकू नयेत
  7. धूलिवंदन, रंगपंचमी साजरी करताना महिला व मुलींच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे

हे पण वाचा : मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत?

मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अनुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी