मुंबईत वाहन फिरवण्यासाठी लागेल 'कलर कोड स्टिकर'

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2021 | 22:13 IST

मुंबई पोलिसांच्या नव्या नियमानुसार खासगी वाहनाच्या समोरच्या आणि मागच्या दर्शनी भागावर सहज दिसेल अशा पद्धतीने 'कलर कोड स्टिकर' लावावा लागेल. स्टिकर वाहनावर लावला असेल तरच ते खासगी वाहन रस्त्यावर आणता येईल.

mumbai police issued colour code stickers for private vehicles
मुंबईत वाहन फिरवण्यासाठी लागेल 'कलर कोड स्टिकर' 

थोडं पण कामाचं

  • मुंबईत वाहन फिरवण्यासाठी लागेल 'कलर कोड स्टिकर'
  • वाहनाच्या समोरच्या आणि मागच्या दर्शनी भागावर सहज दिसेल अशा पद्धतीने 'कलर कोड स्टिकर' लावावा लागेल
  • जवळच्या पोलीस ठाण्यात मिळेल स्टिकर

मुंबईः मुंबईच्या रस्त्यांवर खासगी वाहन फिरवण्यासाठी आता नव्या नियमाचे पालन करावे लागेल. मुंबई पोलिसांच्या नव्या नियमानुसार खासगी वाहनाच्या समोरच्या आणि मागच्या दर्शनी भागावर सहज दिसेल अशा पद्धतीने 'कलर कोड स्टिकर' लावावा लागेल. जवळच्या पोलीस ठाण्यातून मिळालेला हा स्टिकर वाहनावर लावला असेल तरच ते खासगी वाहन रस्त्यावर आणता येईल. mumbai police issued colour code stickers for private vehicles

नव्या व्यवस्थेसाठी मुंबई पोलिसांनी तीन रंगांचे स्टिकर तयार केले आहेत. डॉक्टरांच्या गाड्या, अँब्युलन्स (रुग्णवाहिका), औषधे किंवा ऑक्सिजन अथवा इतर वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा करणारी वाहने यांच्यासाठी लाल स्टिकर असेल. दूध, भाज्या, फळे, बेकरी उत्पादने यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी हिरवा स्टिकर असेल. मुंबई मनपा, वीज विभाग, फोन कंपन्या, मीडियासह सर्व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी पिवळा स्टिकर असेल. 

स्टिकरचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम ४१९ अंतर्गत कारवाई होईल. फक्त नोंदणीकृत आणि मुंबईत वापरण्याची परवानगी असलेल्या वाहनांनाच 'कलर कोड स्टिकर' मिळेल. मुंबईच्या रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी 'कलर कोड स्टिकर' ही व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी