mumbai police prohibits citizens : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास बंदी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 31, 2021 | 17:47 IST

mumbai police prohibits citizens from visiting beaches open grounds seaface public places from 5 pm to next day 5 am : वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधांमुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच या बारा तासांच्या कालावधीत नागरिकांना प्रवेशबंदी

mumbai police prohibits citizens from visiting beaches
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास बंदी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास बंदी
  • दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच या बारा तासांच्या कालावधीत नागरिकांना प्रवेशबंदी
  • निर्बंध १५ जानेवारी २०२२ पर्यंत राहणार

mumbai police prohibits citizens from visiting beaches open grounds seaface public places from 5 pm to next day 5 am : मुंबई : वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधांमुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच या बारा तासांच्या कालावधीत नागरिकांना प्रवेशबंदी आहे. जे नागरिक ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा बेत आखत आहेत त्यांच्यासाठी ही निराश करणारी बातमी आहे.

मुंबई पोलिसांनी लागू केलेले निर्बंध १५ जानेवारी २०२२ पर्यंत राहणार आहेत. यामुळे १५ जानेवारी २०२२ पर्यंत दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच या बारा तासांच्या कालावधीत नागरिकांना मुंबईतील सर्व मैदानं, उद्यानं, मोकळ्या जागा, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे येथे प्रवेशबंदी आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ३० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत ३२७ ओमायक्रॉनबाधीत आढळले आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत आढळलेल्या ७ लाख ७९ हजार ३१ कोरोनाबाधितांपैकी ७ लाख ४८ हजार ७३२ जण बरे झाले आहेत. मुंबईत १६ हजार ३७५ जणांचा कोरोना मृत्यू झाला आहे. इतर कारणामुळे मुंबईत २ हजार ५६४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ११ हजार ३६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी