Mumbai Crime: आईवर चाकूने 11 वार करुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, आता धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 12, 2022 | 18:50 IST

Mumbai Crime News: मुंबईतील मुलुंड परिसरात झालेल्या हत्या आणि आत्महत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.

Mumbai police reveals shocking information in mulund murder and attempt to suicide case crime news marathi
Mumbai Crime: आईवर चाकूने 11 वार करुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, आता धक्कादायक माहिती आली समोर 

मुंबई : उपनगरातील मुंलुंड परिसरात आईची हत्या करुन मुलाने लोकल ट्रेनसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मुलाने असं पाऊल का उचललं यावरुन अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. त्याच दरम्यान आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे.

मुलुंड परिसरात राहणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जय पांचाळ याने शनिवारी आपल्या आईची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलुंड रेल्वे स्थानकात जय याने धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत जय जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जय याने असं का केलं? याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा : पूर आलेली नदी ओलांडताना प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, धक्कादायक VIDEO आला समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय याने सर्वप्रथम घरातील किचनमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आत्महत्या करु शकला नाही. त्याच दरम्यान आई किचनमध्ये आली असता त्यांच्यात वाद झाला. यानंतर जय याने किचनमधील चाकू घेऊन आईची निर्घृण हत्या केली.
पोलिसांना संशय आहे की, जय याने आंघोळ केली आणि त्यानंतर आत्महत्या करण्यासाठी मुलुंड रेल्वे स्टेशन गाठलं. या प्रकरणात जखमी झालेल्या जय हा शुद्धीवर येण्याची पोलीस वाट पाहत असून त्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात येईल.

आईच्या अंगावर 11 वार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय हा घरातील किचनमध्ये आला आणि त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वजनामुळे पंख्याच्या पाती वाकल्या आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. पोलिसांनी सांगितलं की, ज्यावेळी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी आई घरातच होती. थोड्यावेळाने आई किचनमध्ये गेली तेव्हा जय आत्महत्या करत असल्याचं आईच्या लक्षात आलं आणि आईने त्याला आत्महत्येपासून रोखलं. त्यानंतर दोघांत वाद झाला.

यानंतर रागाच्या भरात जय याने आईवर चाकूने वार केले आणि निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपी जय याने आपल्या अंगाला आणि कपड्यांना लागलेलं रक्त पुसलं. मग स्वत: आत्महत्या करण्यासाठी मुलुंड रेल्वे स्थानकात पोहोचला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी