मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा जागरूकतेचा व्हिडिओ शेअर

मुंबई
Updated May 02, 2019 | 18:49 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Mumbai Police Video: सेल्फीच्या नादात आपला जीव गमावणाऱ्या लोकांसाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा जनजागृती केली आहे. मुंबई पोलिसांनी सेल्फीचा नाद खुळा आहे हे दर्शवण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Mumbai police
जीवघेण्या सेल्फीवर मुंबई पोलिसांकडून धक्कादायक व्हिडिओ शेअर  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: आजपर्यंत आपण सेल्फीच्या नादात अनेक जीव गमावल्याच्या घटना ऐकल्या असतील. सेल्फी घेताना मृत्यू होणाच्या घटनेत वाढ होताना दिसते. सेल्फी घेताना कोणी उंचावरून कोसळतं तर कोणाचा बुडून मृत्यू होतो. अशा अनेक घटना जगभरासह मुंबईत होताना आपण ऐकतो. याच सेल्फीच्या नादात आणखीन एक तरूण आपल्या जीवाला मुकला आहे. त्यामुळे या सेल्फीच्या नादात आपला जीव गमावणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. सेल्फी घेताना जीव गमावणाऱ्या एका तरूणाचा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. 

या ट्विटमधून सेल्फी घेणं आपल्या जीवासाठी किती धोकादायक आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी या व्हिडिओतून केला आहे. तसंच या ट्विटमध्ये सेल्फी कसा तुमच्या जीवावर येतो. त्यामुळे असं धाडस चुकीनही करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी या ट्विटमधून केलं आहे. 

मुंबई पोलिसांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये बघता येईल की, एक तरूण उंच इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर उभा आहे. कठड्याच्या कोपऱ्यावर उभा असलेला हा तरूण सेल्फी घेताना दिसतो. क्षणार्धात या तरूणाचा तोल जातो आणि तो त्या कठड्यावरून थेट खाली कोसळतो. हे दृश्य अंगावर काठा आणणारी आहेत. 

 

 

मुंबई पोलिसांनी या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिलं आहे की, सर्वात साहसी सेल्फी घेण्याचा प्रयत्न ? किंवा एक बेजबाबदार साहस ? जे काही होतं ते पूर्णपणे जोखीम घेण्याच्या लायक नव्हतं. हॅशटॅग वापरत सेफ्टी फर्स्ट. 

हा व्हिडिओ कुठला आहे याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मुंबई पोलीस नेहमीच मुंबईकरांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ट्विट करत असतात. मुंबई पोलिसांच्या प्रत्येक ट्विटमध्ये  एक व्हिडिओ शेअर केला जातो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. या ट्विटमधूनही पोलिसांनी सेल्फी घेणं कसं जीवघेणं ठरेल ही दर्शवत अशाप्रकारचं धाडस करू नका, याची जनजागृती पोलिसांनी केली आहे. 

आमिर खानचा व्हिडिओ शेअर

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी आमिर खानचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी आमिर खानचा सिनेमा थ्री इडियट्स  या सिनेमातील व्हिडिओ शेअर केला. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, असा पासवर्ड निवडा की, त्याच्याबद्दल कोणीही कधीच ऐकलं नसेल, ना कोणी तो पासवर्ड शोधू शकेल. 

 

 

मुंबई पोलिस नेहमीच मजेशीर व्हिडिओ शेअर करत ट्विट करतात. तसंच मुंबई पोलिसांचं ट्विट नेहमीच व्हायरल होत असतं. याआधीही मुंबई पोलिसांनी टॉम क्रूजचा व्हिडिओ शेअर केला होता.   मुंबईच्या रस्त्यांवर स्टंट करणाऱ्या बाइकर्सला इशारा देत शहर पोलिसांनी हॉलिवूड स्टार टॉम क्रूजचा एक व्हिडिओ पोस्ट केला.

 

 

टॉम क्रूजचा  ' मिशन इम्पॉसिबल - फॉलआऊट' यातली क्लीप पोलिसांनी ट्विट केली होती. या पोस्टमध्ये पोलिसांनी  म्हटले की, अशा प्रकारे बाईक चालविल्यास दंड करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. क्रूजच्या १२ सेकंदाच्या या क्लिपमध्ये विना हेल्मेट बेदरकारपणे भरधाव बाईक चालवत आहे. बाईक चालवताना टॉम क्रूज मागे पाहत असल्याने समोरून येणाऱ्या कारला त्याची धडक होते.  मुंबई पोलिसांनी बाईकर्सला हेल्मेट घालण्याचा आणि निष्काळजीपण गाडी न चालविण्याचे आव्हान केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा जागरूकतेचा व्हिडिओ शेअर Description: Mumbai Police Video: सेल्फीच्या नादात आपला जीव गमावणाऱ्या लोकांसाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा जनजागृती केली आहे. मुंबई पोलिसांनी सेल्फीचा नाद खुळा आहे हे दर्शवण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Loading...
Loading...
Loading...