मुंबई पोलिसांच्या वाचनात 'क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म' अव्वल

मुंबईसोबतच संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात सध्या एकाच पुस्तकाची चर्चा सुरू आहे- क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म! खास करून आयपीएस लॉबीमध्ये या पुस्तकामुळे उत्सुकता निर्माण झालेली आहे । 

Mumbai Police's 'Criminals in Uniform' tops
मुंबई पोलिसांच्या वाचनात 'क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म' अव्वल 
थोडं पण कामाचं
  • मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडेही या पुस्तकात रस घेताना दिसले.
  • पुस्तकप्रेमी आणि स्वच्छ प्रतिमेचे आयपीएस संजय पांडे यांच्या सध्याच्या वाचनाच्या यादीत हे पुस्तक अग्रस्थानी आहे
  • पुस्तकाचे कथानक आणि पार्श्वभूमी मुंबई पोलिसांशी संबंधित आहे.

मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडेही या पुस्तकात रस घेताना दिसले. पुस्तकप्रेमी आणि स्वच्छ प्रतिमेचे आयपीएस संजय पांडे यांच्या सध्याच्या वाचनाच्या यादीत हे पुस्तक अग्रस्थानी आहे, कारण पुस्तकाचे कथानक आणि पार्श्वभूमी मुंबई पोलिसांशी संबंधित आहे. पुस्तकाचे शीर्षक सुद्धा CIU (Criminals in Uniform) आहे  आणि मुंबई पोलीसची CIU (क्राइम इंटेलिजन्स युनिट) नावाची युनिट अहे, ज्याचा उल्लेख या पुस्तकात वारंवार येतो. आयआयटी कानपूरचे उच्चशिक्षित आयुक्त संजय पांडे आणि हॉवर्ड विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकी यांनाही पुस्तकांमध्ये रस आहे.

केवळ आयुक्त संजय पांडेच नाही तर लेखक जोडीने सांगितल्याप्रमाणे इतर अनेक आयपीएस, इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल स्तरावरील पोलीस कर्मचारीही हे पुस्तक मागवून वाचत आहेत आणि अभिनंदनासह वाचून झाल्यावर थेट लेखकांशी थेट चर्चा करत आहेत. या पुस्तकामुळे पोलीस दलात सनसनाटी निर्माण होण्याचे कारण म्हणजे या पुस्तकात वर्दीच्या आड दडलेला पोलिसांचा क्रूर चेहरा पत्रकार असलेल्या लेखक जोडगोळीने जगासमोर आणला आहे... पोलीस विभागात तर जोरदार चर्चा आहे की- हे पुस्तक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हीरेन हत्येवर आधारित आहे! लेखक जोडगोळीचं म्हणणं आहे की आमच्या पुस्तकातील पात्र, घटना वा इमारतीचं, प्रत्यक्षातील कुणाशी साम्य आढळत असलं, तो तो निव्वळ योगायोग आहे! लेखक जोडगोळीचं  प्रस्तावना मध्ये लिहिले आहे.  

 "या पुस्तकात अनेक सरकारी संस्था आणि तपास यंत्रणांचा उल्लेख आलेला आहे. मात्र त्यामागे, तपास  यंत्रणांची बदनामी करण्याचा, लेखकद्वयीचा बिलकूल उद्देश नाही. हजारो कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांच्या  योगदानातून आकाराला आलेला गौरवपूर्ण इतिहास, दोन-चार अधिकाऱ्यांच्या कृष्णकृत्यांमुळे झाकोळला थोडाच जातो? या पुस्तकात देखील अशाच काही अधिकाऱ्यांची गोष्ट आहे, ज्यांच्यामुळे देशसेवेसाठी बांधील असलेल्या या सुरक्षा यंत्रणा बदनाम झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांमध्ये लपलेल्या त्या तमाम भ्रष्ट अधिकाऱ्य़ांसाठी हे पुस्तक म्हणजे एक चांगलाच धडा असेल, ज्यामुळे आपल्या  सुरक्षायंत्रणेला बट्टा लागेल, असं कोणतंही कृत्य भविष्यात त्यांच्याकडून घडणार नाही."

" मुंबईत जवळजवळ दोन दशकं क्राइम रिपोर्टिंग करणारे वरिष्ठ शोधपत्रकार संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी या जोडगोळीने हे पुस्तक ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ लिहिलं आहे. पुण्याच्या ‘मेहता पब्लिकेशन’ने प्रकाशित केला आहे. लेखक जोडगोळी काहीही सांगत असली, तरी खुद्द पोलीस अधिकाऱ्यांना हे पुरेपूर ठाऊक आहे, की कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे पुस्तक काल्पनिक असल्याचं सांगितलं जात आहे. कारण प्रत्यक्ष तर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अंबानींच्या अँटिलिया सदृश इमारतीचे चित्र वापरण्यात आलं आहे. एवढंच नव्हे, पुस्तकात एक-दोन व्यक्ती वा घटनांमध्येच साम्य आहे असं नाही तर, पानापानांवर प्रत्यक्षातल्या व्यक्ती आणि घटनांमधलं साम्य आढळून येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी