INS Vikrant Scam : सोमय्या पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून समन्स जारी, १३ एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स जारी केला आहे. दोघांनाही पोलिसांनी १३ एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेची टीम आज किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात पोहोचली. आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी पोलीस सोमय्या यांच्या शोधात आहेत.

kirit somaiya
किरीट सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स जारी केला आहे.
  • दोघांनाही पोलिसांनी १३ एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
  • आर्थिक गुन्हे शाखेची टीम आज किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात पोहोचली.

 INS Vikrant Scam :मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स जारी केला आहे. दोघांनाही पोलिसांनी १३ एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेची टीम आज किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात पोहोचली. आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी पोलीस सोमय्या यांच्या शोधात आहेत. कोर्टाने सोमवारी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्वे जामीन फेटळला आहे. त्यमुळे सोमय्या पितापुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे.  

सोमय्या पितापुत्रांच्या नावाने समन्स जारी

राज्याच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा नाही. आता मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघांविरोधात समन्स जारी केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ३ सदस्यीय टीमने आज भाजप नेते किरीट सोमय्या यांचे कार्यालय आणि इतर ठिकाणी झडती घेतली आहे. 


किरीट सोमय्यावर आहे आरोप

आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी ५७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते, हे पैसे राजभवनकडे आलेच नाही अशी माहिती राजभवनने अधिकृत पत्रक काढून दिली. तेव्हा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हे पैसे गेले कुठे असा सवाल केला. तेव्हा किरीट सोमय्या यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी हे पैसे राजकीय पक्षाला दिल्याचे सांगितले. ही घटना अतिशय गंभीर असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. तसेच या पैश्यांची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा ताबा पोलिसांना द्यावा आणि त्यांच जामीन अर्ज फेटाळून लावा अशी मागणी घरत यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी जामिनासाठी काही कागदपत्र दाखल केली होती. या कागदपत्रांनुसार सोमय्या यांनी हा गुन्हा जवळ जवळ कबुल केला होता अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी