नवी मुंबई : मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृ्त्यू झाला आहेत. मृतांमध्ये कारचालकाचाही समावेश आहे. बुधवारी दुपारी हा अपघात झाला. अंधेरीमधील दोघे जण हे गोव्याला फिरायले गेले होते. घरी परतत असताना कळंबोली ब्रिजवर भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. (Mumbai-Pune Accident: After traveling from Goa, they will reach home in some time, it was not so much)
अधिक वाचा : Corona in Maharashtra: राज्यात आढळले कोरोनाचे १८०० रुग्ण, २४ तासांत ६ रुग्णांचा मृत्यू
अंधेरीतील दोघे गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरुन कारने घरी जात होते. यावेळी भरधाव कारवरील जयंत डांगे यांचा ताबा सुटला त्यामुळे कारने समोरील वाहनाला धडक दिली.
अधिक वाचा : Vinayak Mete: विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, CID चौकशीचे दिले आदेश
अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर होवून पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यादरम्यान, झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हा अपघात इतका भीषण होता की, कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्ग हा आता चौपदरी होत असल्याने या महामार्गावर वेगाची मर्यादा पाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होते. अनेकदा या मार्गावर बेदरकारपणे वाहनं चालवून अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्याचं आव्हान सगळ्यांसमोर उभं ठाकले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.