मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून ब्लॉक, असा असेल पर्यायी मार्ग

मुंबई
Updated May 21, 2019 | 10:08 IST

Mumbai pune expressway: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या दरम्यान कोणकोणते पर्यायी मार्ग असतील. जाणून घ्या.

 Mumbai-Pune Expressway
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून ब्लॉक, असा असेल पर्यायी   |  फोटो सौजन्य: BCCL

Block on Mumbai pune expressway for upcoming three days: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आजपासून म्हणजेच २१ मे पासून २३ मे पर्यंत घेण्यात येईल. आजपासून सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. प्रत्येक पंधरा मिनिटाला हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातून एक्स्प्रेस वेवरीला दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. 

ब्लॉकचं वेळापत्रक खालीलप्रमाणे 

२१ मे ते २३ मे असा हा ब्लॉक असेल. दिवसात सहा ब्लॉक घेण्यात येणार असून १५ - १५ मिनिटांचा हा ब्लॉक असेल. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४.१५ मिनिटांप्रयंत 

  1.  पहिला ब्लॉकः सकाळी १० वाजल्यापासून १०.१५ मिनिटांपर्यंत 
  2.  दुसरा ब्लॉकः सकाळी ११ वाजल्यापासून ११.१५ पर्यंत 
  3.  तिसरा ब्लॉकः सकाळी १२ वाजल्यापासून ते १२.१५ पर्यंत 
  4.  चौथा ब्लॉकः दुपारी २ वाजल्यापासून ते २.१५ पर्यंत 
  5.  पाचवा ब्लॉकः दुपारी ३ वाजल्यापासून ते ३.१५ पर्यंत 
  6.  सहावा ब्लॉकः दुपारी ४ वाजल्यापासून ते ४.१५ पर्यंत

MSRDC कडून एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाका येथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणारी मार्गिकेवरील उर्से खिंड येथे दरड आणि मोठे दगड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. हे काम पहिल्या टप्प्यात १४ ते १७ मे दरम्यान करण्यात आलं. त्यावेळी सुद्धा चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉक दरम्यान महामंडळानं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केलं आहे. आता आजपासून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम हे २१ मे ते २३ मे या कालावधीत करण्यात येईल. ब्लॉक दरम्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात येईल. त्यामुळे काही काळासाठी तरी वाहतुकीच्या रांगा लागतील हे निश्चित आहे. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे. 

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर पावसाळ्यात मोठ्या संख्येनं ट्रॅफिकच्या समस्या उद्भवतात. यामुळे प्रवाशांना तासनतास एकाच जागेवर थांबवं लागतं. तसंच पावसाळ्यात मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दरड, मोठे दगड कोसळून अपघाताचे प्रकार वारंवार घडत असतात. हे अपघात रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू होण्याआधीच MSRDC धोकादायक दरड हटवण्याचं आणि मोठे दगड बाजूला करण्याचं काम करते.  याआधी जानेवारीपासून MSRDC नं एक्स्प्रेसवे वर जाळी लावण्याचं काम हाती घेतलं होतं. दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच एक्स्प्रेस वेवर सगळीकडे जाळी लावण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून ब्लॉक, असा असेल पर्यायी मार्ग Description: Mumbai pune expressway: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या दरम्यान कोणकोणते पर्यायी मार्ग असतील. जाणून घ्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles