मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच

मुंबई
Updated Jun 25, 2019 | 08:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Pune Expressway shut: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, आज (२५ जून) एक्सप्रेस वे अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाहा किती काळ एक्सप्रेस वे बंद असणार.

mumbai pune expressway closed
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: मुंबई-पुणे दृतगती महामार्ग अर्थात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तर्फे उच्चदाब क्षमतेची वीज वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी एक्सप्रेस वे वरील वाहतूक दुपारी अर्ध्यातासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरणचं काम दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत होणार आहे त्यामुळे या काळात एक्सप्रेस वे वरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

एक्सप्रेस वे वरील परंदवाडी येथे महावितरणतर्फे हे काम होणार आहे. महावितरणच्या कामामुळे दुपारी एक वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कामामुळे एक्सप्रेस वे वरील अवजड आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्या परंदवाडी येथून अर्ध्या किलोमीटर दूरवर थांबवण्यात येणार आहे. महावितरणचं काम पूर्ण झाल्यावर या गाड्यांचा मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

वाहतूकीत बदल

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील कामामुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांनी वाहतूकीत बदल केले आहेत. मुंबईकडे जाणारी हलकी वाहने किवळे पुलावरुन जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे पुण्याकडे जाणारी हलकी वाहने उर्से टोल नाक्यावरुन जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

यापूर्वीही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर यापूर्वी देखील ओव्हरहेड गँट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. या कामासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ९ मे, २८ मार्च, ३१ जानेवारी, १८ जानेवारी रोजी एक्सप्रेस वे वरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत बदलही केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच Description: Mumbai Pune Expressway shut: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, आज (२५ जून) एक्सप्रेस वे अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाहा किती काळ एक्सप्रेस वे बंद असणार.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles