मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

मुंबई
Updated Jun 13, 2019 | 09:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, एक्सप्रेस वे आज दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

mumbai pune expressway shut closed 2 hrs
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Mumbai Pune Expressway News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन तुम्ही प्रवास करत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. कारण, आज दोन तासांसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ओव्हरहेड गँट्रीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत एक्सप्रेस वे वरील मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

या कामामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करण्याची चिन्ह आहेत. तसेच या काळात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हलक्या वाहनांना जुन्या हायवेवरुन वळवण्यात येणार आहेत. यासोबतच या दुरुस्तीच्या काळात पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. या कामामुळे जड वाहनांना काही अंतरापूर्वीच थांबवण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

एक्सप्रेस वे वरील मळवली ते ताजे पंप या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ओव्हरहेड गँट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात येणआर आहे. या कामामुळे एक्सप्रेस वे वरील मुंबईकडील वाहतूक दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.  एक्सप्रेस वे वर वाहतूक नियमांची माहिती तसेच सुरक्षितते संदर्भातील माहितीसाठी ओव्हरहेड ग्रॅन्टी बसवण्यात येतात.

एक्सप्रेस वे यापूर्वीही बंद 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर यापूर्वी देखील अशाच प्रकारची कामं हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी यापूर्वी देखील अशाच प्रकारे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. पाहूयात यापूर्वी कधी एक्सप्रेस वे वर अशा प्रकारची कामं हाती घेण्यात आली होती.

  1. ९ मे रोजी दोन तासांसाठी बंद 
  2. २८ मार्च रोजी दोन तासांसाठी बंद
  3. ३१ जानेवारी रोजी एक्सप्रेस वे वरील कामासाठी दोन तास वाहतूक बंद
  4. १८ जानेवारी रोजी दोन दासांसाठी बंद 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी Description: Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, एक्सप्रेस वे आज दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles