Mumbai Pune expressway Toll : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांमध्ये 18 टक्क्यांची वाढ

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 28, 2023 | 22:22 IST

Mumbai Pune expressway toll to be hiked by 18 percent from April 1 : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. टोल दरांतील वाढ शनिवार 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. 

Mumbai Pune expressway Toll
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांमध्ये 18 टक्क्यांची वाढ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांमध्ये 18 टक्क्यांची वाढ
  • वाढ शनिवार 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार
  • एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या खासगी आणि एसटी बसच्या तिकिटांच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता

Mumbai Pune expressway toll to be hiked by 18 percent from April 1 : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. टोल दरांतील वाढ शनिवार 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. 

एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांत सुमारे अठरा टक्के वाढ होणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये एक अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार दर तीन वर्षांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरांमध्ये वाढ करत असल्याचे एमएसआरडीसीकडून जाहीर करण्यात आले. 

एक्सप्रेस वे वर अपघात होत असतात. या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि प्रवाशांची सोय व्हावी यासाठी एक्सप्रेस वे वर आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्याची मागणी सातत्याने होत असते. पण या मागणीकडे दुर्लक्ष करत टोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आल्याची टीका एमएसआरडीसीवर होत आहे. 

सध्याच्या टोल दरांमध्ये 1 एप्रिलपासून 50 ते 70 रुपयांची वाढ होत आहे. या दरवाढीमुळे लवकरच एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या खासगी आणि एसटी बसच्या (Maharashtra State Road Transport Corporation : MSRTC / State Transport : ST) तिकिटांच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोलचे 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार असलेले दर

वाहनाचा प्रकार सध्याचा टोल नवा टोल
चारचाकी 270 320
टेम्पो 420 495
ट्रक 580 685
बस 797 940
थ्री एक्सेल 1380 1630
एम एक्सेल 1835 2165

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी